कोल्हापूर,
दि. ८ (जिमाका)- कोरोना विषाणूचा प्रतिबंधात्मक उपाय म्हणून शहरातील
सर्व भाजी विक्रेत्यांनी सक्तीने मास्क आणि हातमोजे वापरावेत, अन्यथा अशा
विक्रेत्यांवर फौजदारी कारवाई केली जाईल, असा इशारा महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ
कलशेट्टी यांनी दिला आहे.
डॉ. कलशेट्टी
म्हणाले, संचारबंदीच्या काळात नागरिकांची गैरसोय होवू नये यासाठी जीवनावश्यक
वस्तुंसह भाजीपाला विक्रीची प्रभाग निहाय सोय करण्यात आली आहे. बाजारामध्ये फिरत
असताना असे दिसून येत आहे की, नागरिक अनावश्यक गर्दी करत आहेत. त्याचबरोबर
विक्रेतेही मास्क, हातमोजे वापरताना दिसत नाहीत. याबाबत कालच एका विक्रेत्यावर
कारवाई करण्यात आली आहे. याचाच परिणाम म्हणून आज काही ठिकाणी मास्कचा वापर करत
असल्याचे दिसून आले.
उद्यापासून
सक्तीने सर्वच विक्रेत्यांनी तसेच नागरिकांनीही खबरदारीचा उपाय म्हणून मास्क
वापरला पाहिजे. भाजीपाला विक्रेत्यांनी हातमोजे वापरले पाहिजेत. अन्यथा
त्यांच्यावर कारवाई केली जाईल. सध्याच्या संचारबंदीच्या काळात अनेक सामाजिक संस्था
निराधार, गरजू लोकांसाठी मदत घेवून पुढे येत आहेत. ही अभिनंदनीय बाब आहे. या
संस्थांनी प्रभाग समितीच्या मार्फत ही मदत गरजूंना पोहचवावी. परस्पर या मदतीचे
वापट करताना गर्दी होण्याची शक्यता आहे आणि यामधून धोका निर्माण होवू शकतो
त्यासाठी अशा सामाजिक संस्थांनी प्रभाग समितीकडे मदत द्यावी. ती गरजू, निराधार
लोकांपर्यंत पोहचविली जाईल, असेही महापालिका आयुक्त म्हणाले.
0 0 0 0 00
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.