कोल्हापूर, दि. 1 (जि.मा.का) :- शिरोळ तालुक्यातील
आरोग्य यंत्रणा अधिक सक्षम करण्यास शासनाचे प्राधान्य असून कोरोना विषाणूचा
प्रादुर्भाव रोखण्यासाठी लागणारी उपकरणे खरेदी करण्यासाठी आरोग्य राज्यमंत्री
राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी त्यांच्या स्थानिक विकास निधीतून 50 लाखाचा निधी
उपलब्ध करुन देण्याची घोषणा आज केली.
कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी
शिरोळ तालुक्यात आरोग्य यंत्रणा सज्ज असून संशयीत व बाधीत रुग्णाच्या उपचारासाठी
आरोग्य विभागामार्फत आवश्यक त्या सर्वउपाययोजना केल्या आहेत. येथील आरोग्य
यंत्रणेला व्हेटीलेंटरसह अनेक उपकरणे उपलब्ध करुन देणे गरजेचे असल्याने स्थानिक विकास निधीतून 50 लाखाचा निधी
तात्काळ उपलब्ध करुन दिला जाईल. या निधीतून व्हेंटीलेटर, मॅानिटर, थर्मल स्कॅनर,
पी.पी. ई. किट, एन. 95 मास्क, आक्सिंजन सिलेंडर आदि उपकरणे खरेदी करण्यात येणार
आहेत, असेही राज्यमंत्री श्री. यड्रावकर यांनी सांगितले.
शिरोळ तालु्क्यातील प्रमुख शहरे व
ग्रामीण भागातील रुग्णासाठी आयसोलेशन कक्ष ठिकठिकाणी तयार केले असून कोरोनाचा
संसर्ग रोखण्याकामी सर्व डॅाक्टर्स, नर्सेस व संबंधीत कर्मचाऱ्यांचे महत्वपूर्ण
योगदान लाभले आहे, याबद्दलही त्यांनी समाधान व्यक्त केले. शिरोळ तालुक्यात 67 नागरीक परदेश
दौऱ्यावरुन आले असून त्यांना होम क्वारंटाईन केले होते, यातील 62 नागरीकांनी
क्वारंटाईनचा कार्यकाळ पूर्ण केला आहे. तर 5 नागरीक सध्या होम क्वारंटाईन आहेत.
तालुक्यामध्ये अद्याप एकही संशयीत अथवा बाधीत रुग्ण आढळला नाही. तरीही दक्षता
म्हणून आम्ही शिरोळ तालुक्यातील शिरोळ ग्रामीण रुग्णालयामध्ये 14, दत्तवाड ग्रामीण
रुग्णालय 15, सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रामधून 28, डॅा. जे.जे.मगदूम आयुर्वेदीक
मेडीकल कॅालेज अगर 50, अंकूर व नवजीवन हॅास्पिटल कुरुंदवाड येथे 25, मोदी
हॅास्पिटल जयसिंगपूर 30 व पायोस हॅास्पिटल जयसिंगपूर येथे 12 अशा 174 आयसोलेशन
बेडची व्यवस्था केली असल्याचेही आऱोग्य राज्यमंत्री यड्रावकर यांनी सांगितले.
000000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.