गुरुवार, ४ फेब्रुवारी, २०२१

10 वी पुरवणी परीक्षेत उत्तीर्ण प्रशिक्षणार्थ्यांसाठी ऑनलाईन प्रवेश प्रकिया पुनश्च: सुरू

 


कोल्हापूर, दि. 4 (जिल्हा माहिती कार्यालय): शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था  (आय.टी.आय.) येथे 10 वी पुरवणी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या व अद्याप प्रवेश न मिळालेल्या प्रशिक्षणार्थ्यांसाठी सुरू झालेली ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया पुनश्च: सुरू करण्यात आली असल्याची माहिती संस्थेच्या प्राचार्यांनी दिली.

          शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत प्रवेशासाठी ऑनलाईन पध्दतीने प्रवेश अर्ज करणे व प्रवेश अर्ज भरल्यानंतर प्रवेश अर्ज शुल्क जमा करणे दि. 7 फेब्रुवारी रोजीपर्यंत सायं. 5 वाजेपर्यंत. गुणवत्ता यादी प्रसिध्द करणे दि. 8 फेब्रुवारी रोजी सायं. 5 वाजता. संस्थेमध्ये प्रवेशोच्छुक व नोंदणीकृत उमेदवारांनी औद्योगिक प्रशिक्षणसंस्थेत सकाळी 8 ते 11 वाजेपर्यंत उपस्थित राहून समुपदेशन फेरीकरिता दररोज स्वतंत्ररित्या हजेरी नोंदवावी दि. 9 ते 15 फेब्रुवारी. हजेरी नोंदविलेल्या उमेदवारांमधून त्याच दिवशी दुपारी 1 वा. संस्थास्तरावर गुणवत्ता यादी प्रसिध्द करण्यात येईल व त्यानुसार प्रवेशासाठी उपलब्ध जागा, उमेदवाराची मागणी व अर्हता यांच्याआधारे जागाचे वाटप करण्यात येईल दि. 9 ते 15 फेब्रुवारी. निवड झालेल्या उमेदवारांनी सर्व मूळ प्रमाणपत्राच्या पडताळणीनंतर त्याच दिवशी प्रवेश निश्चित करावा. त्याचदिवशी प्रवेश निश्चित न केल्यास सदरहू जागा दुसक्ऱ्या दिवशी रिक्त समजून प्रवेशासाठी खुली करण्यात येईल दि. 9 ते 15 फेब्रुवारी.

        प्रवेशाबाबतचे सविस्तर वेळापत्रक http://admission.dvet.gov.in  या संकेतस्थळावर उपलब्ध असून उमेदवारांनी त्याप्रमाणे कार्यवाही करायची आहे. याबाबत अधिक माहिती आवश्यक असल्यास औद्योगिक प्रशिक्षण संस्था, कळंबा रोड, कोल्हापूर येथे संपर्क साधावा.

000000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.