सोमवार, ८ फेब्रुवारी, २०२१

नेहरू युवा केंद्र आणि जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण कक्षामार्फत एड्स जनजागृती कार्यक्रम संपन्न

 


कोल्हापूर, दि. 8 (जिल्हा माहिती कार्यालय): एड्स कंट्रोल बोर्ड मुंबई व नेहरू युवा केंद्र, संगठन मुंबई नुसार राज्यातील ज्या जिल्ह्यामध्ये एड्सचे प्रमाण जास्त आहे, अशा पंधरा जिल्ह्यामध्ये कोल्हापुरचा समावेश असल्याने नेहरू युवा केंद्र आणि जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण कक्ष, कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने एड्स जनजागृती कार्यक्रम संपन्न झाला.

 

जिल्ह्यातील शेणगाव, डिलगे, बाजारभोगाव, कोतोली, बालिंगे, वळीवडे, नेर्ली, गडमुडशिंगी, ठिकपुर्ली, दानोळी, टाकवडे, शिरढोण, शिरदवाड, अब्दुल लाट, जयसिंगपूर, भादोले, खोची, पेठ वडगाव, वाठारसरूड या २० गावांमध्ये नेहरू युवा केंद्रमार्फत निबंध स्पर्धा, भिंतीचीत्र, पथनाट्य, रक्तदान शिबीर या माध्यमातून एड्स विषयी जनजागृती करण्यात आली. जिल्ह्यातील गावांमधून  युवकांनी रक्तदान केले, त्याचबरोबर अश्वमेध मिडिया प्रा.लि. यांच्या माध्यमातून एड्स विषयी जनजागृती करण्याकरिता पथनाट्य सादर करण्यात आले.

कार्यक्रमासाठी ग्रामीण भागातील महिला, ग्रामस्थ, युवक-युवतींनी पथनाट्य जनजागृतीमध्ये भरगोस प्रतिसाद दिला. भिंतीचीत्रमध्ये संबंधित  गावातील दर्शनी भागामध्ये ग्रामपंचायतीच्या सहकार्याने अतिशय सुलभ आणि आकर्षक भिंतीचित्राच्या माध्यमातून ग्रामस्थांना आणि युवकांना एड्सबाबत जागृत राहणे आणि रक्तदान करण्याबाबत संदेश देण्यात आले.

000000

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.