गुरुवार, ४ फेब्रुवारी, २०२१

मागासवर्गीय मुलांच्या शासकीय वसतिगृह इमारतीसाठी संपर्क साधण्याचे आवाहन

 

 

कोल्हापूर, दि. 4 (जिल्हा माहिती कार्यालय): शहरात कार्यरत असलेल्या गुणवंत मागासवर्गीय मुलांच्या शासकीय वसतिगृहास 100 विद्यार्थी क्षमतेची सर्व सोई सुविधायुक्त इमारत सार्वजनिक विभागाच्या प्रचलित दरानुसार भाडेतत्वावर हवी आहे. इच्छुक इमारत मालकांनी गुणवंत मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतीगृह व सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय येथे संपर्क करण्याचे आवाहन वसतीगृहाचे वॉर्डन एम.एन. जगताप यांनी केले आहे.

000000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.