कोल्हापूर, दि. 26 (जिल्हा माहिती कार्यालय): गडहिंग्लज तालुक्यातील
ग्रामदैवत श्री काळभैरव देवाची यात्रा दि. 28 फेब्रुवारी ते 1 मार्च अखेर 50
लोकांच्या उपस्थितीत धार्मिक कार्यक्रम होऊन संपन्न होणार आहे. यात्रा सुरळीत,
सुसह्य व सुरक्षित होण्याकरिता पोलीस अधीनियम सन 1951 चे कलम 4 अन्वये रहादरी
विनीमय अधिकारान्वये पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी दि. 28 फेब्रवारी ते 1
मार्च या एक दिवसाच्या कालावधीकरिता वाहतुक नियमन आदेश जारी केले आहेत.
वाहतुक मार्गात केलेले बदल-
कोल्हापूरकडून काळभैरव मार्गे येणारी वाहतुक ही
दि. 28 फेब्रुवारी रोजी रात्री 10 वा. ते दि. 1 मार्च रोजी रात्री 10 वा. पर्यंत
बंद करण्यात येणार असून सदरची वाहतुक ही सन साईस हॉटेल बहीरेवाडी मार्गे वडरगे
रोडने गडहिंग्लजकडे वळवण्यात येणार आहे.
गडहिंग्लजमार्गे कोल्हापूरकडे जाणारी वाहतुक ही
गडहिंग्लज- लाखे नगर कमान-शेंद्री-हनिमनाळ, हिटणी (कर्नाटक) मार्गे तवंदी घाट
कोल्हापूरकडे वळविण्यात येणार आहे.
00000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.