सोमवार, १५ फेब्रुवारी, २०२१

गडहिंग्लज येथे फूड प्रोसेसिंग कार्यक्रमाचे आयोजन

 


कोल्हापूर, दि. 15 (जिल्हा माहिती कार्यालय) : महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र (एम.सी.ई.डी.) तसेच शिवाजी विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने गडहिंग्लज येथे फूड प्रोसेसिंग आणि मसाले निर्मितीवर आधारित प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन दि. 22 फेब्रुवारी ते 3 मार्च या कालावधीत करण्यात आले असल्याची माहिती कोल्हापुरी मसाला क्लस्टरचे चेअरमन दीपक मांगले यांनी दिली.

 या प्रशिक्षण कार्यशाळेत उद्योजकीय मानसिकता, व्यक्तिमत्व विकास, अन्नप्रक्रिया क्षेत्रातील उद्योग संधी, उद्योग उभारणीचे विविध टप्पे, अन्नधान्य जतन शास्त्रशुध्द प्रक्रिया, प्रयोगशाळा चाचणीचे महत्व आणि माहिती, मिरची, हळदपूड, कांदा, आले, लसूण प्रक्रिया, शास्त्रोक्त पध्दतीने सर्व प्रकारचे मसाले, लोणची निर्मिती, मार्केटिंगचे नवनवे तंत्र व कौशल्य प्रकार तसेच मार्केट सर्वे, ब्रँडींग, शासकीय कर्ज योजना आणि अन्नप्रक्रिया उद्योगासाठी आवश्यक शासकीय परवाने यांची सविस्तर माहिती देण्यात येणार आहे. त्यासाठी शिवाजी विद्यापीठाच्या फूड टेक्नालॉजी विभागाचे प्रमुख डॉ.ए.के.साहू, डॉ. अभिजित गाताडे, डॉ. तेजस्विनी व्हसकोटी, डॉ.एस.एम.लोखंडे, डॉ.ए.एम.गुरव, डॉ.शबाना मेमन, रेणुका तुरूम्बेकर, संजय पाटील या तज्ञांचे मार्गदर्शन मिळणार आहे.

कार्यक्रमामध्ये सहाभागी होवू इच्छिणाऱ्या नव उद्योजकांनी कोल्हापुरी मसाला क्लस्टरचे चेअरमन श्री. मांगले (9850678257), महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राचे विभागीय अधिकारी रामचंद्र गावडे (9021343734) किंवा प्रकल्प अधिकारी प्रवीण कायंदे(9403078774) एस.सी.ई.डी.व्दारा उद्योगभवन, महावीर गार्डन समोर असेंब्ली रोड, कोल्हापूर यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहनही एस.सी.ई.डी.व्दारा करण्यात आले आहे.

00000

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.