कोल्हापूर,
दि. 8 (जिल्हा माहिती कार्यालय) : कोव्हिड लसीकरण मोहिमेसाठी नोंदणी झालेल्यांबाबत
विभाग प्रमुखांनी आढावा घ्यावा, अशी सूचना जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिली.
जिल्हाधिकारी कार्यालयातील राजर्षी छत्रपती शाहू
सभागृहात कोव्हिड लसीकरण मोहीम जिल्हा कृती दल समितीची आज बैठक झाली. बैठकीला
मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, अतिरिक्त पोलीस प्रमुख तिरूपती काकडे,
जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. हर्षला वेदक,
डॉ. अमोलकुमार माने आदी उपस्थित होते.
जिल्हा माता व बालसंगोपन अधिकारी डॉ. फारूख देसाई
यांनी यावेळी संगणकीय सादरीकरण करून नियोजन आणि पूर्व तयारीबाबत माहिती दिली. जिल्ह्यामध्ये
16 जानेवारी ते 6 फेब्रुवारी दरम्यान ग्रामीण भागात उद्दिष्टाच्या 40 टक्के, शहरी भागात
49 टक्के लसीकरण झाले आहे. सद्या जिल्ह्यामध्ये कोतोली प्राथमिक आरोग्य केंद्र, गांधीनगर
उपजिल्हा रूग्णालय, मुरगूड ग्रामीण रूग्णालय आणि हुपरी प्राथमिक आरोग्य केंद्र अशी
4 नव्याने वाढवून ग्रामीण भागासाठी 17 आणि शहरी भागासाठी 8 अशी एकूण 25 सत्रांचे
नियोजन करण्यात आले आहे. आजअखेर 69 हजार 80 लस प्राप्त झाल्या आहेत. 38 हजार 80 लसींचे
वितरण केंद्रांना करण्यात आले असून 31 हजार लसींचा साठा आहे.
लस देण्यात येणाऱ्या केंद्रांवर माहितीपट, संदेश,
सूचना प्रसारित करण्याची सूचना श्री. काकडे यांनी केली.
00000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.