कोल्हापूर,
दि. 5 (जिल्हा माहिती कार्यालय) : छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व विकास
मानव संस्था (सारथी) मार्फत छत्रपती शाहू महाराज राष्ट्रीय संशोधन अधिछात्रवृत्तीकरिता
ऑनलाईन अर्ज प्राप्त झाले आहेत. ज्या उमेदवारांच्या अर्जात त्रुटी आहेत त्यांची
पूर्तता करून पात्र उमेदवारांना मुलाखतीस सारथी, पुणे येथे बोलावले जाणार असल्याचे
छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व विकास मानव संस्था (सारथी) चे
व्यवस्थापकीय संचालक अशोक काकडे यांनी कळविले आहे.
पात्र उमेदवारांची
निवड प्रक्रिया माहे फेब्रुवारी 2021 च्या शेवटच्या आठवड्यापर्यंत पार पाडण्याचे
नियोजन असल्याची त्यांनी कळविले आहे.
00000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.