कोल्हापूर, दि. 25 (जिल्हा माहिती कार्यालय): जिल्ह्यातील विविध
कार्यालयातील अधिकारी-कर्मचारी यांची लसीकरणासाठी किती नोंदणी झाली, त्यापैकी
कितीजणांचे लसीकरण झाले याबाबत कार्यालयनिहाय अहवाल बनवावा, असे निर्देश
जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी आज दिले.
जिल्हाधिकारी
कार्यालयातील छत्रपती राजर्षी शाहू सभागृहात कोव्हिड लसीकरण मोहीम जिल्हा कृती दल
समितीची बैठक आज झाली. जिल्हा माता व बालसंगोपन अधिकारी डॉ. फारूख देसाई यांनी
संगणकीय सादरीकरण करून आजअखेरचा अहवाल दिला. जिल्हाधिकारी श्री. देसाई म्हणाले,
प्रत्येक विभाग प्रमुखाने नोंदणी झालेल्या अधिकारी-कर्मचारी यांचे समुपदेशन करावे.
त्यांचे लसीकरण होईल याची जबाबदारी पार पाडावी. आरोग्य विभागाने लसीकरणाबाबत
समुपदेशनावर भर द्यावा. जिल्ह्यात जास्तीत-जास्त लसीकरण होईल, याबाबत सर्वांनी
प्रयत्न करावा.
1 ते 8 मार्च
राष्ट्रीय जंतनाशक मोहीम
1 ते
19 वर्षे वयोगटातील सर्व मुला-मुलींना जंतनाशक गोळी देऊन त्यांचे आरोग्य चांगले
ठेवणे. पोषण स्थिती, शिक्षण व जीवनाचा दर्जा उंचावणे यासाठी दि. 1 ते 8 मार्च या
कालावधीत राष्ट्रीय जंतनाशक मोहीम राबविण्यात येणार असल्याची माहिती डॉ. देसाई
यांनी यावेळी संगणकीय सादरीकरण करून दिली.
शाळा,
महाविद्यालयातील विद्यार्थ्यांबरोबरच ऊस तोड कामगार आणि वीट भट्टी कामगारांच्या
मुलांनाही या मोहिमेचा लाभ दिला जावा, याबाबत कार्यवाही करावी, अशी सूचना
जिल्हाधिकारी श्री. देसाई यांनी यावेळी दिली.
या
बैठकीला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, जिल्हा आरोग्य
अधिकारी डॉ. योगेश साळे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अनिल माळी आदी उपस्थित होते.
000000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.