कोल्हापूर, दि. 10 (जिल्हा माहिती कार्यालय) : दुधगंगा
प्रकल्पातील निढोरी शाखा कालवा तसेच कूर शाखा कालवा यावरील नियोजित आवर्तन पूर्ण
करण्यासाठी फेब्रुवारीमध्ये शेतीसाठी पाणी उपसा करणाऱ्या उपसायंत्रावर उपसाबंदी करण्यात
आली असल्याची माहिती पाटबंधारे विभागाचे उपकार्यकारी अभियंता यांनी दिली. तर
पिण्याच्या पाणी पुरवठा करणाऱ्या नळ पाणी पुरवठा योजना या उपसाबंदीतून वगळ्यात येत
आहेत.
दुधगंगा उजवा कालव्यावरील (मुख्य कालवा)
कि.मी. 1 ते 24 पर्यंत ऐनी, आटेगांव, सावर्डे-पाटणकर, कासारपुतळे, कासारवाडा,
ढेंगेवाडी, धामणवाडी, सरवडे, इ. ता. राधानगरी व उंदरवाडी, बोरवडे ता. कागल या
गावातील शेतीसाठी वापरल्या जाणाऱ्या उपसायंत्रांवर दि. 12 फेब्रुवारी रोजी सकाळी 8
वाजल्यापासून ते दि. 16 फेब्रुवारी रोजी सकाळी 8 वाजेपर्यंत उपसाबंदी जारी करण्यात
आली आहे.
वरील कालावधीमध्ये पिण्याच्या पाणी पुरवठा
व्यतिरिक्त इतर कारणासाठी (औद्योगिक व शेतीसाठी उपसाबंदी कालावधीत अनाधिकृत उपसा
आढळून आल्यास संबंधित उपसायंत्र जप्त करून परवानाधारकाचा उपसा परवाना 1 वर्षाच्या
कालावधीसाठी रद्द करण्यात येईल व होणाऱ्या नुकसानीस पाटबंधारे खाते जबाबदार राहणार
नाही.)
00000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.