सोमवार, १ फेब्रुवारी, २०२१

लोकशाही दिनात 32 अर्ज प्राप्त

 



कोल्हापूर, दि. 1 (जिल्हा माहिती कार्यालय): जिल्हास्तरीय लोकशाही दिनामध्ये 32 अर्ज प्राप्त झाले असल्याची माहिती करमणूक तहसिलदार रंजना बिचकर यांनी दिली.

            जिल्हाधिकारी कार्यालयाच्या महाराणी ताराबाई सभागृहात जिल्हाधिकारी दौलत देसाई  यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित केलेल्या लोकशाही दिनास प्र. निवासी उपजिल्हाधिकारी दत्तात्रय कवितके, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी ज्ञानदेव वाकुरे, जिल्हा उपनिबंधक अमर शिंदे, जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख अधिकारी वसंत निकम, तहसिलदार रंजना बिचकर यांच्यासह सर्व संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

          आजच्या लोकशाही दिनात महसूल 9, पोलीस अधीक्षक कार्यालय 6, जिल्हा परिषद 4, जिल्हा उपनिबंधक कार्यालय 2, साखर सह संचालक 1, पंचायत समिती पन्हाळा 1, जिल्हा अधिक्षक भूमी अभिलेख कार्यालय 4, जिल्हा अग्रणी बँक 2, महावितरण कार्यालय 1, प्रदुषण महामंडळ कार्यालय 1 व कोल्हापूर महानगरपालिका 1 असे एकूण 32 अर्ज प्राप्त झाले आहेत.

          गतवर्षी झालेल्या लोकशाही दिनात प्राप्त झालेल्या अर्जांचा आढावा यावेळी घेण्यात आला.

00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.