कोल्हापूर,
दि. 15 (जिल्हा माहिती कार्यालय) :
आर.आर.(आबा) पाटील सुंदर गाव पुरस्कार वितरण समारंभ उद्या मंगळवार दि. 16
फेब्रुवारी रोजी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री सतेज पाटील यांच्या
हस्ते व सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्या प्रमुख
उपस्थितीत तर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बजरंग पाटील यांच्या अध्यक्षतेखाली होणार
आहे.
कार्यक्रमास
सर्वश्री खासदार संभाजीराजे छत्रपती, संजयसिंह मंडलिक, धैर्यशील माने, आमदार सर्वश्री
अरूण लाड, जयंत आसगावकर, डॉ. विनय कोरे, प्रकाश आवाडे, पी.एन.पाटील, प्रकाश आबिटकर,
राजेश पाटील, चंद्रकांत जाधव व राजू (बाबा) आवळे, ऋतुराज पाटील यांची प्रमुख पाहुणे
म्हणून उपस्थिती राहणार आहे. तसेच जिल्हाधिकारी दौलत देसाई, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष
सतीश पाटील, बांधकाम व आरोग्य समिती सभापती हंबीरराव पाटील, शिक्षण व अर्थ समिती सभापती
प्रविण यादव, महिला व बालकल्याण सभापती डॉ. पद्माराणी पाटील व समाज कल्याण सभापती स्वाती
सासणे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
00000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.