गडहिंग्लज मधील 50, पन्हाळामधील
42, करवीरमधील 54, शाहूवाडीमधील 41, भुदरगडमधील 16 व शिरोळमधील 33 ग्रामपंचायतींचा
समावेश
कोल्हापूर, दि. 18 (जिल्हा माहिती कार्यालय) : सरपंच, उपसरपंच पदांची निवड करण्यासाठी 25
फेब्रुवारी रोजी ग्रामपंचायतींची पहिली सभा बोलावण्याचे आदेश जिल्हाधिकारी दौलत
देसाई यांनी आज दिले. यामध्ये गडहिंग्लजमधील 50, पन्हाळामधील 42, करवीरमधील 54, शाहूवाडीमधील
41, भुदरगडमधील 16 व शिरोळमधील 33 ग्रामपंचायतींचा समावेश आहे.
गडहिंग्लज
तालुक्यातील तळेवाडी ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाच्या आरक्षणाबाबत मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या
तालुक्यातील 9 फेब्रुवारी रोजी द्यावयाच्या ग्रामपंचायतीच्या सरपंच, उपसरपंच पदाच्या
निवडी 16 फेब्रुवारी पर्यंत रोखून ठेवण्याबाबत आदेशित केलेले होते. सुनावणी अंती
15 फेब्रुवारी रोजी आदेश देण्यात आला आहे. त्यानुसार तालुक्यातील 50 ग्रामपंचायतींच्या
सरपंच, उपसरपंच निवडीसाठी गुरूवार दि. 25 फेब्रुवारी रोजी सभा बोलावण्याचा आदेश आज देण्यात आला.
पन्हाळा
तालुक्यातील उंड्री ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाच्या आरक्षणाबाबत मुंबई
उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या तालुक्यातील 9 फेब्रुवारी रोजी द्यावयाच्या
ग्रामपंचायतीच्या सरपंच, उपसरपंच पदाच्या निवडी 16 फेब्रुवारी पर्यंत रोखून ठेवण्याबाबत
आदेशित केलेले होते. याचिकेच्या सुनावणीअंती 15 फेब्रुवारी रोजी आदेश देण्यात आला आहे.
त्यानुसार तालुक्यातील 42 ग्रामपंचायतींच्या सरपंच, उपसरपंच निवडीसाठी गुरूवार दि.
25 फेब्रुवारी रोजी सभा बोलावण्याचा आदेश आज
देण्यात आला.
करवीर
तालुक्यातील कोगे व खुपिरे ग्रामपंचायतीच्या
सरपंच पदाच्या आरक्षणाबाबत मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या तालुक्यातील
9 फेब्रुवारी रोजी द्यावयाच्या ग्रामपंचायतीच्या सरपंच, उपसरपंच पदाच्या निवडी 16 फेब्रुवारी
पर्यंत रोखून ठेवण्याबाबत आदेशित केलेले होते. याचिकेच्या सुनावणीअंती 15 फेब्रुवारी
रोजी आदेश देण्यात आला आहे. त्यानुसार तालुक्यातील 54 ग्रामपंचायतींच्या सरपंच, उपसरपंच
निवडीसाठी गुरूवार दि. 25 फेब्रुवारी रोजी सभा बोलावण्याचा आदेश आज देण्यात आला.
शाहूवाडी
तालुक्यातील गिरगाव ग्रामपंचायतीच्या सरपंच
पदाच्या आरक्षणाबाबत मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या तालुक्यातील
9 फेब्रुवारी रोजी द्यावयाच्या ग्रामपंचायतीच्या सरपंच, उपसरपंच पदाच्या निवडी 16 फेब्रुवारी
पर्यंत रोखून ठेवण्याबाबत आदेशित केलेले होते. याचिकेच्या सुनावणीअंती 15 फेब्रुवारी
रोजी आदेश देण्यात आला आहे. त्यानुसार तालुक्यातील 41 ग्रामपंचायतींच्या सरपंच, उपसरपंच
निवडीसाठी गुरूवार दि. 25 फेब्रुवारी रोजी सभा बोलावण्याचा आदेश आज देण्यात आला.
भुदरगड
तालुक्यातील फणसवाडी ग्रामपंचायतीच्या
सरपंच पदाच्या आरक्षणाबाबत मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या तालुक्यातील
9 फेब्रुवारी रोजी द्यावयाच्या ग्रामपंचायतीच्या सरपंच, उपसरपंच पदाच्या निवडी 16 फेब्रुवारी
पर्यंत रोखून ठेवण्याबाबत आदेशित केलेले होते. याचिकेच्या सुनावणीअंती 17 फेब्रुवारी
रोजी आदेश देण्यात आला आहे. या आदेशान्वये याचिकाकर्ता यांचा अर्ज मान्य करण्यात आलेला
असून भुदरगड तालुक्यातील अनुसूचित जाती व अनुसूचित स्त्री, अनुसूचित जमाती व अनुसूचित
जमाती स्त्री व नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग व नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग स्त्री
हे आरक्षण कायम ठेवून सर्वसाधारण प्रवर्गातील सर्वसाधारण व सर्वसाधारण स्त्री या प्रवर्गाचे
फेरआरक्षण सोमवार दि. 22 फेब्रुवारी रोजी भुदरगड या ठिकाणी काढण्यासाठी तहसिलदारांना
कळविले आहे.
त्यामुळे
आता सार्वत्रिक निवडणूक झालेल्या 45 निवडणुकांमधील वरील प्रवर्गातील 16 ग्रामपंचायतींच्या
पहिला सभा घेण्यासाठी उर्वरित 29 ग्रामपंचायतींच्या पहिल्या सभेचा आदेश फेर आरक्षण
दि. 22 फेब्रुवारीनंतर पारित करण्यात येणार आहे. त्यानुसार तालुक्यातील 16 ग्रामपंचायतींच्या सरपंच,
उपसरपंच निवडीसाठी गुरूवार दि. 25 फेब्रुवारी रोजी सभा बोलावण्याचा आदेश आज देण्यात आला.
शिरोळ
तालुक्यातील शिरटी, मजरेवाडी, तमदलगे या ग्रामपंचायतीच्या
सरपंच पदाच्या आरक्षणाबाबत मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या तालुक्यातील
9 फेब्रुवारी रोजी द्यावयाच्या ग्रामपंचायतीच्या सरपंच, उपसरपंच पदाच्या निवडी 16 फेब्रुवारी
पर्यंत रोखून ठेवण्याबाबत आदेशित केलेले होते. याचिकेच्या सुनावणीअंती 15 फेब्रुवारी
रोजी आदेश देण्यात आला आहे. त्यानुसार तालुक्यातील 33 ग्रामपंचायतींच्या सरपंच, उपसरपंच
निवडीसाठी गुरूवार दि. 25 फेब्रुवारी रोजी सभा बोलावण्याचा आदेश आज देण्यात आला.
00000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.