कोल्हापूर, दि. २२ (जिल्हा माहिती
कार्यालय)- कोल्हापूर ते अहमदाबाद ही विमान सेवा आजपासून सुरू झाली. खासदार संजय
मंडलिक, आमदार चंद्रकांत जाधव यांच्या उपस्थितीत आज या सेवेला प्रारंभ झाला, अशी
माहिती विमानतळ संचालक कमल कटारिया यांनी दिली.
ही उड्डाण सेवा आठवड्यातून सोमवार, बुधवार आणि
शुक्रवार अशी तीन दिवस असणार आहे. सकाळी 10: 15 वाजता पोहोचेल आणि 10:30 वाजता
सुटण्याच्या वेळेवर उपलब्ध असेल. यासह
कोल्हापूर-तिरुपती उड्डाण देखील पुन्हा सुरू झाली आहे. अहमदाबाद-कोल्हापूर- अहमदाबाद हवाई सेवा सुरू
झाल्यानंतर आता हे आरसीएस कोल्हापूर विमानतळ 5 आंतरराष्ट्रीय विमानतळाशी जोडले
गेले आहे. मान्यवरांच्या उपस्थितीत ज्येष्ठ नागरिक प्रवाश्यांच्या हस्ते केक
कापण्यात आला. या नवीन मार्गाबद्दल खूप
आनंद झाल्याची प्रतिक्रिया प्रवाशांनी व्यक्त केली. या हवाई सेवेमुळे कोल्हापूर, सांगली, सातारा,
रत्नागिरी, बेळगाव येथील नागरिकांना अहमदाबादला जाणे सोपे झाले आहे.
इंडिगो स्टेशन मॅनेजर विशाल
भार्गव या सोहळ्यास उपस्थित होते.
0000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.