शुक्रवार, १९ फेब्रुवारी, २०२१

शिवजयंतीनिमित्त जिल्हा परिषदेत शिवप्रतिमेचे पूजन

 



कोल्हापूर, दि.19 (जिल्हा माहिती कार्यालय)- शिवजयंती निमित्ताने जिल्हा परिषदेत मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

 श्री. चव्हाण यांनी यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांची थोडक्यात महती सांगितली. यावेळी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक डॉ. रवी शिवदास, मुख्य लेखा व वित्त अधिकारी संजय राजमाने, जिल्हा समाज कल्याण अधिकारी दीपक घाटे, ग्राम पंचायतचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अरुण जाधव, पाणी पुरवठा व स्वच्छताच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रियदर्शनी मोरे, जिल्हा कृषी अधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, उप मुख्य लेखा अधिकारी राहुल कदम उपस्थित होते.

000000

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.