कोल्हापूर, दि. 18 (जिल्हा माहिती कार्यालय) : कोरोना प्रतिबंधात्मक उपाय-योजनांबाबत
सुक्ष्म नियोजन करा. विशेषत: कॉन्टक्ट ट्रेसिंगवर भर द्या, अशी सूचना पालक सचिव
राजगोपाल देवरा यांनी केली.
पालक
सचिव श्री. देवरा यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील राजर्षी छत्रपती शाहू सभागृहात जिल्हा
नियोजन समिती खर्च, कोव्हिड-19 खर्च आणि कोव्हिड-19 लसीकरण मोहीम याबाबत आढावा बैठक
घेतली. बैठकीला जिल्हाधिकारी दौलत देसाई, महापालिका आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे, मुख्य
कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, अपप्र जिल्हाधिकारी
किशोर पवार, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अजयकुमार माने, जिल्हा ग्रामीण विकास
यंत्रणेचे प्रकल्प संचालक डॉ. रवी शिवदास, जिल्हा नियोजन अधिकारी विजय पवार उपस्थित होते.
जिल्हा
नियोजन अधिकारी श्री. पवार यांनी संगणकीय सादरीकरण केले. जिल्हाधिकारी श्री. देसाई
यांनी यावेळी सविस्तर माहिती दिली. सर्वसाधारणमध्ये 26.79 टक्के खर्च झाला असून अनुसूचित
जाती उपयोजनामध्ये 39.45 टक्के खर्च झाला. कोव्हिड नियंत्रित करण्यासाठी राष्ट्रीय
आरोग्य अभियानामधून 2838.63 लाख तसेच एसडीआरएफमधून 2924.69 लाख निधी प्राप्त झाला आहे.
अद्यापही 16 कोटी 14 लाख 40 हजार 387 प्रलंबित
अनुदान आहे. त्याचबरोबर भविष्यात होणाऱ्या खर्चासाठी 44 कोटी 50 लाख 32 हजार
निधीची मागणी करण्यात आली आहे.
जिल्हा
आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे यांनी यावेळी माहिती दिली. आजअखेर 3 लाख 45 हजार
979 तपासणी चाचणी करण्यात आल्या आहेत. रूग्ण बरे होण्याचा दर 96.28 इतका आहे.
पालक
सचिव श्री. देवरा यावेळी म्हणाले, दररोजच्या तपासण्या वाढवा. सुक्ष्म नियोजन करून कॉन्टक्ट
ट्रेसिंगवर भर द्या. व्हेंटीलेटर्स उपलब्ध साधनसामुग्री याबाबत आढावा घ्या. सनियंत्रण
करा. यानंतर महाआवास अभियानबाबत आढावा घेवून ते म्हणाले, कमी कामगिरी असणाऱ्या तालुक्यांमध्ये
लक्ष केंद्रीत करून गती द्या.
यावेळी
निवासी उपजिल्हाधिकारी भाऊ गलंडे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता संभाजी माने,
जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अनिल माळी, समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त विशाल लोंढे आदी
उपस्थित होते.
000000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.