गुरुवार, ११ फेब्रुवारी, २०२१

तहसिलदार पन्हाळा यांनी सरपंच पदाच्या आरक्षणाची अवलंबलेली कार्यपध्दत योग्य -जिल्हाधिकारी दौलत देसाई

 


          कोल्हापूर, दि. 11 (जिल्हा माहिती कार्यालय) : तहसिलदार पन्हाळा यांनी पन्हाळा तालुक्यातील उंड्री ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाचे आरक्षण निश्चित करण्यासाठी अवलंबलेली कार्यपध्दती नियमाप्रमाणे योग्य असल्याने याचिकाकर्त्याचा अर्ज जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी आज निकाली काढला.

मा. उच्च न्यायालय मुंबई यांनी दिलेल्या निर्देशाप्रमाणे अजित श्रीपती खोत, सदस्य (ग्रामपंचायत) उंड्री, ता. पन्हाळा या ग्रामपंचायतीचे सरपंच पदाचे आरक्षणाबाबत घेतलेल्या आक्षेप निकाल पत्रात नमूद कारणास्तव फेटाळण्यात येत असल्याचा निकाल आज जिल्हाधिकारी श्री.देसाई यांनी दिला.

00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.