गुरुवार, ४ फेब्रुवारी, २०२१

राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धेतील रेफ्री, अंपायर यांची परिपूर्ण माहिती सादर करण्याचे आवाहन

 


कोल्हापूर, दि. 4 (जिल्हा माहिती कार्यालय): जिल्ह्यातील क्रीडा शिक्षक व तज्ञ मार्गदर्शक यांनी रेफ्री, अंपायर व जज्ज यांची परिपूर्ण माहिती व पंच परीक्षा पास झाल्याबाबतच्या प्रमाणपत्राची  झेरॉक्स जिल्हा क्रीडा कार्यालय येथे कार्यालयीन वेळेत 9 फेब्रुवारीपर्यंत सादर करण्याचे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी डॉ. चंद्रशेखर साखरे यांनी केले आहे.

भारतीय खेल महासंघामार्फत आयोजित राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धेमधील ज्या खेळांचा ऑलम्पिंक गेम्समध्ये समावेश आहे, अशा प्रत्येक खेळाचे जिल्ह्यातील रेफ्री, अंपायर व जज्ज यांची परिपूर्ण माहिती नमुन्यात सादर करावी, असेही  डॉ. साखरे यांनी पत्रकाव्दारे कळविले आहे.

00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.