कोल्हापूर, दि. 5
(जिल्हा माहिती कार्यालय) : सामाजिक
क्षेत्रात काम करण्याची आवड असलेल्या युवक/युवतींसाठी नेहरू युवा केंद्र
सातारामार्फत काम करण्याची संधी उपलब्ध करण्यात आली आहे. यासाठी इच्छुक
युवक/युवतींनी दि. 20 फेब्रुवारीपर्यंत www.nyks.nic.in या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज
करण्याचे आवाहन नेहरू युवा केंद्राचे जिल्हा युवा अधिकाऱ्यांनी केले आहे.
ग्रामीण भागातील
युवक/युवती ज्यांना सामाजिक क्षेत्रात काम करण्याची आवड आहे. संवाद कौशल्य, संघटन
कौशल्य, नेतृत्व गुणाचा विकास अशा विविध स्तरावर ग्रामीण युवक/युवतींना नेहरू युवा
केंद्र संघटन (युवा कार्यक्रम आणि क्रिडा मंत्रालय भारत सरकार) जिल्हा कार्यालय,
नेहरू युवा केंद्र सातारामार्फत काम करण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे.
स्वयंसेवकांनी केंद्राचे कार्यक्रम, स्वच्छता अभियान, आरोग्य विषयक, एड्स
जनजागृती, जलशक्ती अभियान अशा प्रकारचे विविध कार्यक्रम आयोजित करणे व सामाजिक
कार्यक्रमात सहभाग असणे आवश्यक आहे.
यासाठी
एकुण 24 जागा आहेत. प्रत्येक तालुक्यात 2 जागा व जिल्हा कार्यालयात काम
करण्याकरिता 2 जागा (संगणकीय ज्ञान व टॅली आवश्यक). प्रतिमाह 5 हजार रूपये मानधन
देण्यात येईल. 1 एप्रिल 2021 रोजी 18 वर्ष पूर्ण व 29 वर्षाच्या आतील तसेच महिला
उमेदवारास प्राधान्य. उमेदवार कमीत-कमी 10 वी पास असावा. नियमित शिक्षण घेणारे
विद्यार्थी या पदाकरिता पात्र नाहीत. ज्या तालुक्यासाठी उमेदवार अर्ज करणार आहे,
तो त्या तालुक्याचा रहिवाशी असावा. पदवीधर व संगणकाचे ज्ञान असावे. स्मार्ट फोन व
विविध प्रकारचे ॲप वापरण्याचे कौशल्य असणे आवश्यक आहे. युवा मंडळाचा सदस्य असल्यास
प्राधान्य.
अधिक माहितीसाठी व अर्जाच्या नमुन्यासाठी नेहरू युवा केंद्र, भवानी मंडप,
कोल्हापूर येथे दूरध्वनी क्र. 0231-2548999 वर संपर्क साधावा.
000000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.