कोल्हापूर, दि. 1 (जिल्हा माहिती
कार्यालय): विकेल ते पिकेल धोरणांतर्गत
संत शिरोमणी सावता माळी रयत बाजार अभियान आत्माअंतर्गत जिल्हा अधीक्षक कृषी
अधिकारी, कार्यालयात भरवण्यात आलेल्या शेतकरी ते थेट ग्राहक या विक्री उपक्रमास ग्राहकांचा
उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला, अशी माहिती प्रकल्प संचालिका सुनंदा कुऱ्हाडे यांनी
दिली.
या
आठवडी बाजारात जिल्ह्यातील 3 शेतकरी उत्पादक कंपन्या, 4 आत्मा अंतर्गत शेतकरी गट
तसेच 17 वैयक्तिक शेतकरी सहभागी झाले. शेतकऱ्यांनी 10.5 क्विंटल भाजीपाला व शेतमाल
विक्रीसाठी आणला होता. यामध्ये विविध भाजीपाल्यासह सेंद्रीय गूळ, गूळ पावडर, हळद
पावडर, आले पावडरची विक्री झाली.
00000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.