बुधवार, २४ फेब्रुवारी, २०२१

किशोर मासिकाचे वर्गणीदार होण्याची सुवर्णसंधी

 


कोल्हापूर, दि. 24 (जिल्हा माहिती कार्यालय): बालभारतीकडून प्रकाशित झालेल्या किशोर मासिकाला यावर्षी 50 वर्षे पूर्ण होत आहेत. मासिकाचे हे सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे. याचे औचित्य साधून फक्त 50 रू. वार्षिक वर्गणी भरून बालभारतीचे अत्यंक माफक दरामध्ये वर्षभराचे अंक व दिवाळी अंक उपलब्ध करून देण्यात आला असून याचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य डॉ. आय.सी.शेख यांनी केले आहे.

 14 नोव्हेंबर 1971 या दिवशी पंडित नेहरू जयंतीदिनी ‘किशोर’ हे मासिक बालभारतीकडून प्रकाशित झाले आहे. हे मासिक विद्यार्थ्यांना वाचनाची गोडी लागावी. पुरक वाचनासाठी दर्जेदार आशय आणि चित्रांचा समावेश असणारे 9 ते 15 वयोगटातील मुलांसाठी विचारांची पर्वणी मिळावी या उद्देशाने सुरू करण्यात आले. ग्रामीण भागातील मुलांना अद्ययावत असे अभ्यासक्रमाबाहेरील ज्ञान पोहोचविण्याचे एक सशक्त साधन म्हणजे किशोर मासिक होय. ज्ञान, विज्ञान, मुल्यसंस्कांरासाठी हे मासिक समाज, पालक, मुले यांच्यासाठी उपयुक्त आहे. चालू घडामोडी वैज्ञानिक दृष्टिकोन, सर्जनशीलता वृध्दिगंत होण्यासाठी यामध्ये विचारांची पेरणी केलेली असते.

या संधीचा लाभ विद्यार्थी, शिक्षक, पालक व समाजधुरीणांनी घ्यावा. वर्गणीदार होण्यासाठी किशोर मासिक हे ॲप डॉऊनलोड करून घ्यावे. तसेच www.kishor.ebalbharati.in या वेबसाईटवरून फक्त 50 रू. पाठवून किंवा संपादक किशोर बालभारती पुणे यांचे नावे मनीऑर्डर करून वर्गणीदार होता येईल, असेही डॉ. शेख यांनी सांगितले.

00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.