कोल्हापूर, दि. 24 (जिल्हा माहिती कार्यालय): चालू शैक्षणिक वर्षात इ. 12
वी विज्ञान शाखा व डिप्लोमा तृतीय वर्षातील विद्यार्थी व अन्य प्रयोजनार्थ जात प्रमाणपत्र
पडताळणीचा अर्ज सादर करणाऱ्या अर्जदारांकरिता ऑनलाईन वेबीनारचे आयोजन करण्यात आले
आहे, अशी माहिती जिल्हा जाती प्रमाणपत्र पडताळणीचे संशोधन अधिकारी सचिन साळे यांनी
दिली.
जात पडताळणीसाठी विहीत नमुन्यातील अर्ज भरण्याबाबत
आवश्यक प्रक्रियेची माहिती विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी शुक्रवार दि. 26
फेब्रुवारी रोजी सायं. 5 ते 6.30 या वेळेत वेबिनारचे आयोजन करण्यात आले आहे. वेबिनार
झूम मिटींगव्दारे होणार आहे. यासाठी आयडी 3787865525 असून पासकोड 1234 असा आहे.
000000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.