गुरुवार, २५ फेब्रुवारी, २०२१

जन्म-मृत्यू नोंदणीविषयी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित

 


कोल्हापूर, दि. 25 (जिल्हा माहिती कार्यालय): जन्म-मृत्यू नोंदणी विषयक जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा स्तरावर समिती गठित करण्यात आली असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे यांनी दिली.

जिल्हास्तरीय समितीची कार्यकक्षा व कर्तव्य याप्रमाणे जिल्ह्यातील जन्म-मृत्यू व अर्भक मृत्यू नोंदणीचे संनियंत्रण व आढावा घेणे. जिल्ह्यातील जन्म-मृत्यू व अर्भक मृत्यू घटनांची 100 टक्के नोंदणी होते किंवा नाही यासाठी आवश्यक त्या उपाययोजनेसंबंधी चर्चा व तशी उपाययोजना करणे. जिल्ह्यातील जन्म व मृत्यू घटनांची नोंदणी वेळेवर व 100 टक्के होण्याकरिता सर्व संबंधित जिल्हा, तालुका व गाव पातळीवरील शासकीय विभागांशी समन्वय ठेवणे. केंद्र शासनाच्या crsorgi.gov.in या संगणक प्रणालीवर जन्म-मृत्यूच्या 100 टक्के नोंदी होतील यासाठी या समितीने आवश्यक त्या सर्व उपाययोजना करावयाच्या आहेत. शासन निर्देशानुसार या समितीची दर तिमाहीतून एकदा सभा आयोजित करणे अपेक्षित आहे.

00000

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.