बुधवार, ३ फेब्रुवारी, २०२१

चंदगड येथील शासकीय वसतिगृह इमारतीसाठी संपर्क साधण्याचे आवाहन

 


कोल्हापूर, दि. 3 (जिल्हा माहिती कार्यालय): चंदगड येथील मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृहासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या प्रचलित दरानुसार भाडे तत्वावर 5 हजार ते 5 हजार 500 चौरस फुट इमारतीची जागा भाडे तत्वावर हवी आहे. इच्छुक इमारत मालकांनी गृहपाल, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुलांचे वसतिगृह, चंदगड यांच्याशी दूरध्वनी क्र. 02320-224696 वर त्वरित संपर्क साधण्याचे आवाहन समाज कल्याण विभागामार्फत करण्यात येत आहे.

इमारतीमध्ये सायकल स्डॅण्ड, पार्किंग व्यवस्था, स्वयंपाकगृह, सभागृह, स्नानगृह, स्वच्छतागृहे, भरपूर पाणी विज, सीसीटिव्ही, अग्निशामकयंत्र व कंपाऊंड व्हॉल इ. सोई सुविधा असणे आवश्यक असल्याचेही समाज कल्याण विभागामार्फत पत्रकाव्दारे कळविण्यात आले आहे.

00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.