शुक्रवार, २० मे, २०२२

गौणखनिजाच्या खाणपट्टा नुतनीकरणासाठी 24 मे रोजी उपस्थित रहावे

 


 

कोल्हापूर, दि. 20 (जिमाका): दिर्घमुदतीची खाणपट्टा मुदत संपल्यानंतर ज्या व्यक्तींनी जिल्हाधिकारी कार्यालय येथे नुतनीकरणासाठी अर्ज सादर केलेले आहेत, अशा खाणपट्टा धारकांनी जिल्हा खनिकर्म अधिकारी, जिल्हाधिकारी कार्यालय, कोल्हापूर यांच्या कार्यालयात  दि. 24 मे रोजी सकाळी 10.30 वाजता गौण खाणपट्ट्याबाबतच्या नुतणीकरणाच्या परिपूर्ण प्रस्तावासह उपस्थित रहावे. खाणपट्टा नुतनीकरण करण्याकरिता जमिनीचे किमान क्षेत्र एक हेक्टर आर एवढे आवश्यक आहे.

 

खाणपट्टा नुतनीकरणाकरीता सदर जमिनीबाबत संबंधित तालुक्यातील तहसिल कार्यालयाचा चौकशी अहवाल, ज्याठिकाणी खाणपट्टा करावयाचा आहे त्या जागेचा मंजूर खाणकाम आराखडा, सबंधित गावच्या ग्रामपंचायतीचा ना-हरकत दाखला व पर्यावरण विभाग यांचा ना-हरकत दाखला इत्यादी कागदपत्रांची आवश्यकता आहे.

 

ही सर्व कागदपत्रे दि. 24 मे रोजी व्यक्तीशः उपस्थित राहून सादर करावीत, जेणेकरून प्रस्तावाची पडताळणी करुन खाणपट्टा नूतनीकरणाची कार्यवाही  तात्काळ करता येईल, असे आवाहन जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत करण्यात आले आहे.

000000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.