कोल्हापूर दि. 2 (जिमाका) : 'लोकराजा
राजर्षी छत्रपती शाहू महाराज कृतज्ञता पर्वानिमित्त श्री शाहू छत्रपती मिल येथे आज
सोमवारी सुरु झालेल्या रेखाटन प्रदर्शनाला युवराज्ञी संयोगिताराजे छत्रपती यांनी भेट
दिली.
असंख्य रेषांच्या स्केचेसमधून जिवंत केलेल्या कोल्हापूरच्या प्राचीन इमारती
पाहून त्या भारावून गेल्या. हे स्केचेस पाहून जुन्या शाहुकालीन कोल्हापूरच्या आठवणींना
उजाळा मिळाल्याचे त्यांनी नमूद केले.
दिनांक २ मे ते २२मे
पर्यंत छत्रपती शाहू मिल येथे कोल्हापुरातील जुन्या ऐतिहासिक वास्तू, इमारती यांच्या
स्केचेस चे प्रदर्शन भरवण्यात आले आहे. कोल्हापूरचा प्राचीन, समृद्ध असा वारसा इमारती
आणि विविध कलाकृतींच्या माध्यमातून जगभरातील पर्यटकांना दरवर्षी आकर्षित करीत असतो.
कोल्हापुरातील प्राचीन कलाकृतींच्या वास्तू बांधणीतील बारकावे या रेखाटनाच्या माध्यमातून
सर्व शाहू प्रेमींना अनुभवता येणार आहेत. राजर्षी शाहूंचा हा ऐतिहासिक समृध्द वारसा
प्रत्येकाने नक्की अनुभवावा आणि या इमारतीच्या संवर्धनासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन
युवराज्ञी संयोगिताराजे छत्रपती यांनी केले.
जागतिक पातळीवरील वास्तू विशारद शिरीष बेरी, शरदचंद्र
मोघे, मिलिंद रणदिवे, अमरजा निंबाळकर यांच्यासह रेखाटन ग्रुपच्या सदस्यांनी प्रदर्शनाची
आकर्षक मांडणी केली आहे.
00000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.