गुरुवार, १९ मे, २०२२

विद्यार्थ्यांनी महाडिबीटी पोर्टलवर शिष्यवृत्तीचे अर्ज 31 मे पर्यंत सादर करावेत - सहायक आयुक्त विशाल लोंढे

 


कोल्हापूर, दि. 19 (जिमाका): शैक्षणिक वर्ष सन 2021-22 करीता महाडिबीटी पोर्टलवर शिष्यवृत्तीचे अर्ज ऑनलाईन पध्दतीने भरण्याची प्रक्रिया सुरु आहे. अनुसुचित जाती, विमुक्त जाती व भटक्या जमाती, इतर मागास प्रवर्ग व विशेष मागास प्रवर्ग या प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी परिपूर्ण अर्ज महाडिबीटी पोर्टलवर दि. 31 मे  पर्यंत सादर करावेत, असे आवाहन समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त विशाल लोंढे यांनी केले आहे.

सामाजिक न्याय व विशेष व सहाय विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या भारत सरकार मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती व राज्य शासनाची मॅट्रीकोत्तर शिक्षण शुल्क परिक्षा शुल्क प्रतिपुर्ती योजना, राजर्षी शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती (इ.११वी व १२वी) व व्यावसायिक अभ्यासक्रमात शिकणाऱ्या अनु. जातीच्या विद्यार्थ्यांना विद्यावेतन योजना महाडिबीटी या पोर्टलव्दारे ऑनलाईन करण्यात आल्या आहेत.

महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांचे अर्ज नोंदणीचे प्रमाण वाढण्याकरीता प्रयत्न कारावेत. तसेच जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयांनी त्यांच्या महाविद्यालयातील प्रत्येक मागासवर्गीय विद्यार्थ्याचा अर्ज भरला गेला आहे का याची खात्री करावी. त्यांच्या स्तरावर प्रलंबित असणारे अर्ज छाननी करून लवकरात लवकर ऑनलाईन प्रणालीतून सहायक आयुक्त समाज कल्याण कार्यालयकडे वर्ग करावेत, असेही श्री. लोंढे यांनी पत्रकाव्दारे कळविले आहे.

00000

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.