बुधवार, ११ मे, २०२२

पंडित दीनदयाळ उपाध्याय ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन

 


 

कोल्हापूर, दि. 11 (जिमाका) : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रामार्फत लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज स्मृति-शताब्दी कृतज्ञता पर्व निमित्त दिनांक 19 ते 22 मे पर्यंत पंडित दीनदयाळ उपाध्याय ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन केले आहे. इच्छुक युवक-युवतींनी       दि. 22 मे पर्यंत आपले पसंतीक्रम नोंदवून या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहाय्यक आयुक्त संजय माळी यांनी केले आहे.

या ऑनलाईन रोजगार मेळाव्यात सेल्स एक्झिक्युटिव्ह, रिलेशनशिप मॅनेजर, सॉफ्टवेअर डेव्हलपर ॲन्ड  मॅन्युअर टेस्टर, पीएचपी डेव्हलपर/वेब डेव्हलपर, ग्राफिक डिझायनर, बिजनेस डेव्हलपमेंट ऑफिसर, एससीओ एक्झिक्युटिव्ह, पीएचपी डेव्हलपर/वेब डेव्हलपर, सपोर्ट एक्झिक्युटिव्ह फॉर बँक/कोऑपरेटिव्ह सॉफ्टवेअर, मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह फॉर बँक/कोऑपरेटिव्ह सॉफ्टवेअर, विमा प्रतिनिधी, क्लार्क अशा रिक्तपदांसाठी कोल्हापूर जिल्ह्यातील नामांकित 7 आस्थापनांनी आज अखेर 140 पेक्षा जास्त रिक्तपदांद्वारे मोठी सुवर्णसंधी देऊ केली आहे. यापुढेही अधिक रिक्तपदे उपलब्ध होऊ शकतात.

मेळावा केवळ ऑनलाईन पसंतीक्रम नोंदविणा-या उमेदवारांसाठीच घेण्यात येणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील इच्छुक उमेदवारांनी आपापल्या युझर आयडी व पासवर्डच्या आधारे या विभागाच्या www.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर लॉगीन करुनûआपल्या शैक्षणिक पात्रतेनुसार उचित असलेल्या रिक्तपदासाठी आपला पसंतीक्रमò व इच्छुकता ऑनलाईन पध्दतीने नोंदवावी. आवश्यक पात्रता धारणú करीत असल्याची खात्री करुनûपदाची निवड करण्याची दक्षता घ्यावी.            

                अधिक माहितीसाठी  जिल्हा कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या दूरध्वनी क्र. 0231-2545677 वर संपर्क साधावा.

00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.