मंगळवार, १० मे, २०२२

पुरालेखागार कार्यालयाच्यावतीने मोडी लिपी प्रशिक्षणाचे आयोजन

 


 

कोल्हापूर, दि. 10 (जिमाका) : पुरालेखागार कार्यालयाच्यावतीने दि. 19 ते 28 मे 2022 या कालावधीत मोडी लिपी प्रशिक्षण वर्ग आयोजित करण्यात आला आहे. या प्रशिक्षण वर्गात शासकीय कर्मचारी, इतिहासाचे अभ्यासक, विद्यार्थी तसेच सर्वसामान्य जनतासुद्धा सहभागी होऊ शकते. मोडीलिपी प्रशिक्षणास मर्यादित जागा असून प्रथम नाव नोंदणी करणा-यास प्राधान्य दिले जाणार आहे. प्रवेश घेण्यासाठी व अर्जाच्या उपलब्धतेसाठी कोल्हापूर पुरालेखागार, हुजूर रेकॉर्ड इमारत, टाऊन हॉल बागेसमोर, कोल्हापूर येथे (0231- 2644394) प्रत्यक्ष संपर्क साधावा, असे आवाहन कोल्हापूर पुरालेखागार विभागाच्या सहाय्यक संचालक दिपाली पाटील यांनी केले आहे.

प्रशिक्षण वर्गाचे अर्ज कोल्हापूर पुरालेखागार कार्यालयात उपलब्ध होणार आहेत. या वर्गासाठी विद्यार्थांना प्रशिक्षण शुल्क रुपये ३०० व इतरांना प्रशिक्षण रुपये ६०० आहे. अर्ज सादर करताना प्रशिक्षणार्थीचे आयकार्ड साईजचे दोन फोटो व ओळखपत्राची छायांकित प्रत सादर करणे आवश्यक आहे. प्रशिक्षण दि. 19 ते 28 मे या कालावधीत सायंकाळी ४ ते ६ या वेळेत श्री. शहाजी छत्रपती महाविद्यालय, दसरा चौक, कोल्हापूर येथे होईल. प्रशिक्षण पूर्ण करणा-या उमेदवारांची १०० गुणांची लेखी परीक्षा घेण्यात येणार असून परीक्षेत उत्तीर्ण होणा-या प्रशिक्षणार्थीना पुराभिलेख संचालनालयातर्फे प्रमाणपत्र देण्यात येणार आहे, असेही श्रीमती पाटील यांनी पत्रकाव्दारे कळविले आहे.

000000

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.