बुधवार, ४ मे, २०२२

वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांच्या हस्ते 60 व्या हीरक महोत्सवी राज्य नाट्य स्पर्धेचा उद्घाटन समारंभ

 


 

कोल्हापूर, दि. 4 (जिमाका): संगीतसूर्य केशवराव भोसले यांचे 101 वे स्मृती वर्ष तसेच राजर्षी छत्रपती शाहू महाराज स्मृती शताब्दी वर्षास अभिवादन करुन 60 व्या हीरक महोत्सवी राज्य नाट्य स्पर्धा अंतिम फेरीचा उद्घाटन समारंभ वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्य मंत्री अमित विलासराव देशमुख यांच्या हस्ते तर ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवार दि. 6 मे रोजी दुपारी 4 वाजता संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृह कोल्हापूर येथे होणार आहे.

कार्यक्रमास पालकमंत्री सतेज उर्फ बंटी पाटील, सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेंद्र  पाटील यड्रावकर, आमदार प्रकाश आबिटकर व नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार असून सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे वरिष्ठ अधिकारी, जिल्ह्यातील खासदार, आमदार, प्रशासकीय अधिकारी यांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे, अशी माहिती सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक बिभिषण चवरे यांनी दिली.

00000000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.