कोल्हापूर दि. 2 (जिमाका) : 6 मे 2022 रोजी सकाळी 10 वाजता लोकराजा राजर्षी
छत्रपती शाहू महाराज यांना 100 सेकंद आदरांजली वाहण्यात येणार आहे. दि न्यू एज्यूकेशन
संस्थेमार्फत विविध ठिकाणी जागृती
पथनाट्य
सादर करण्यात येणार असून या पथनाट्याचा शुभारंभ पालकमंत्री सतेज पाटील, शिवाजी विद्यापीठाचे
कुलगुरु डॉ. डी. टी. शिर्के, जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांच्या प्रमुख उपस्थितीत
आज शाहू मिल येथे करण्यात आला. १०० सेकंद लोकराजासाठी, १०० सेकंद कृतज्ञतेचे हा आशय
घेऊन पथनाट्य सादर केले जाणार आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.