कोल्हापूर, दि.6 (जिमाका):- जिल्हा
परिषद प्राथमिक शिक्षण पंचायत समिती करवीर यांच्यामार्फत लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू
महाराज यांना स्वरांजली कार्यक्रमातून अभिवादन करण्यात आले. स्वरांजली कार्यक्रमात
सुमारे २५० शिक्षकांनी सहभाग घेतला. स्वरांजली कार्यक्रमाचे उद्घाटन प्राथमिक शिक्षणाधिकारी
आशा उबाळे, कोल्हापूर विभागाचे सहायक शिक्षण संचालक सुभाष चौगुले यांच्या हस्ते छत्रपती
शिवाजी महाराज व छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण करुन करण्यात आले
स्वरांजली कार्यक्रमात पोवाडा कवाली देशभक्तीपर गीते नाटिका भारुड
समूहगीत असे प्रकार सादर करण्यात आले. गटविकास
अधिकारी जयवंत उगले व गटशिक्षणाधिकारी शंकर
यादव यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम सादर करण्यात आला. स्वरांजली कार्यक्रमात
शिक्षण विस्तार अधिकारी विश्वास सुतार धनाजी पाटील भगवान चौगुले , वसुंधरा कदम यांच्यासह
250 शिक्षकांनी सहभाग घेतला.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.