कोल्हापूर, दि. 19 (जिमाका): आधारभूत किंमत
योजना अंतर्गत रब्बी/ उन्हाळी हंगामातील धान हमीभावाने विक्रीकरिता शेतकरी नोंदणीची
अंतिम मुदत 30 एप्रिल होती. परंतु, शासनाने रब्बी/उन्हाळी हंगामातील धान विक्री
करिता शेतकरी नोंदणीची मुदत 31 मे पर्यंत वाढविली असल्याचे जिल्हा मार्केटींग
अधिकारी चंद्रकांत खाडे यांनी कळविले आहे.
ज्या शेतकऱ्यांनी
अद्याप नोंदणी केली नाही, त्यांनी त्वरीत चंदगड तालुका खरेदी विक्री संघ लि.
मार्फत तुर्केवाडी, चंदगड तालुका सहकारी कृषिमाल फलोत्पादन संघ लि. अडकूर, आजरा
तालुका किसान सहकारी भात खरेदी विक्री संघ मर्या. आजरा, राधानगरी तालुका शेतकरी
सह. संघ मर्या. सरवडे, भुदरगड तालुका शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघ. गारगोटी, भुदरगड, दि महाराष्ट्र स्टेट को- ऑप मार्केटिंग फेडरेशन लि. जिल्हा
मार्केटिंग अधिकारी कार्यालय, कोल्हापूर, कोल्हापूर जिल्हा
सहकारी खरेदी विक्री संघ कोल्हापूर- बामणी, ता. कागल, राधानगरी तालुका जोतिर्लिंग सहकारी
भाजीपाला खरेदी विक्री संघ राशिवडे मार्फत पणोरी, ता. राधानगरी या आठही संस्थेच्या
कार्यालयांशी अथवा जिल्हा मार्केटिंग कार्यालय, श्री शाहू मार्केट यार्ड, कांदा
बटाटा लाईन, कोल्हापूर तसेच कृषि उत्पन्न बाजार समिती गडहिंग्लज व कोल्हापूर येथील
बाजार समितीच्या कार्यालयाशी तसेच आपल्या तालुक्याच्या सहायक निबंधक कार्यालय अथवा
तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क करावा, असे आवाहनही जिल्हा मार्केटिंग
अधिकारी श्री. खाडे यांनी केले आहे.
000000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.