बुधवार, ११ मे, २०२२

सामाजिक न्याय विभागाच्या विविध पुरस्कारासाठी रविवारपर्यंत अर्ज सादर करावेत - सहायक आयुक्त विशाल लोंढे

 


 

        कोल्हापूर, दि. 11 (जिमाका) : सामाजिक न्याय विभागामार्फत समाज कल्याण क्षेत्रामध्ये वैशिष्ट्यपूर्ण काम करणा-या व्यक्ती व स्वयंसेवी संस्थांना प्रोत्साहन मिळावे यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे पुरस्कार, कर्मवीर दादासाहेब गायकवाड पुरस्कार, संत रविदास पुरस्कार, शाहू, फुले, आंबेडकर पुरस्कार व डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय प्राविण्य पुरस्कार यांच्या नावे पुरस्कार देऊन व्यक्ती व संस्थाना गौरविण्यात येते. सदर पुरस्कारासाठी रविवार दि. 15 मे पर्यंत अर्ज सादर करावेत, असे आवाहन सहायक आयुक्त विशाल लोंढे यांनी  केले आहे.

              दि. 15 मे रोजी रविवार साप्ताहीक सुट्टी असली तरी सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, कार्यालय कोल्हापूर येथे पुरस्काराचे प्रस्ताव स्विकारले जाणार आहेत. मुदतीनंतर प्राप्त होणारे प्रस्ताव स्विकारले जाणार नाहीत याची नोंद घ्यावी.

000000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.