कोल्हापूर, दि. 20 (जिमाका): 56 राष्ट्रीय
छात्रसेन पथक कोल्हापूर यांचे वार्षिक प्रशिक्षण शिबीर क्र. 304 दि. 1 ते 10 जून
या कालावधीमध्ये एनसीसी भवन येथे होणार आहे. यासाठी
लागणाऱ्या वस्तुंचा पुरवठा करण्यासाठी दरपत्रक मागविण्यात येत असून पुरवठादारांनी दरपत्रक
56 महाराष्ट्र राछासे पथक, एनसीसी भवन, शिवाजी विद्यापीठ परिसर, कोल्हापूर येथे सादर
करावेत, असे आवाहन 56 महाराष्ट्र राछासे पथकाच्या कमांडिंग अधिकाऱ्यांनी केले आहे.
सर्व प्रकारची
धान्ये, तेल, डाळी, मसाल्याचे पदार्थ इ., बेकरी उत्पादने, मटन, चिकन, अंडी, दुध व दुग्धजन्य
पदार्थ, पालेभाजी व फळभाजी आणि फळे व स्वयंपाकी व दोन मदतनीस यासाठी दरपत्रक मागविण्यात
येत आहे.
00000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.