कोल्हापूर, दि. 11 (जिमाका) : महासैनिक दरबार हॉलकरिता
कंत्राटी पदे तात्पुरत्या स्वरुपात भरायची आहेत. इच्छुक उमेदवारांनी अर्ज
अन्य आवश्यक कागदपत्रांसह 31 मे पर्यंत जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, कोल्हापूर
येथे सादर करावेत, असे आवाहन उपजिल्हाधिकारी तथा प्रभारी जिल्हा सैनिक कल्याण
अधिकारी प्रशांत खेडेकर यांनी केले आहे.
तात्पुरत्या
स्वरुपात भरावयाची पदे याप्रमाणे-
लिपीक-
01, एकत्रित मानधन- रुपये 13 हजार 600, पात्रता एमएससीआयटी, मराठी व इंग्लिश
टायपिंग उत्तीर्ण असणे आवश्यक.
विजतंत्री
-01, मानधन- रुपये 13 हजार 500, पात्रता- विद्युत शाखेतील आयटीआय कोर्स पास असावा.
वाहन
चालक- 01, मानधन रुपये 13 हजार 500,पात्रता- वाहन चालवण्याचा आरटीओ परवाना आवश्यक.
सफाई
कर्मचारी (महिला)- 02, मानधन- रुपये 13 हजार व सफाई कर्मचारी (पुरुष)-02, मानधन
रुपये 13 हजार याप्रमाणे राहील.
वरील
सर्व पदे माजी सैनिक संवर्गातून निव्वळ तात्पुरत्या स्वरुपात कंत्राटी पध्दतीने
भरावयाची आहेत. माजी सैनिक प्रवर्गातील उमेदवार उपलब्ध न झाल्यास नागरी
उमेदवारांचा विचार करण्यात येईल. प्राप्त अर्जांची छाननी करुन उमेदवारांची मुलाखत
शुक्रवार दि. 10 जून रोजी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात सकाळी 10 वाजता घेण्यात
येईल. उमेदवार निवडीचे किंवा एखादा अर्ज कोणतेही कारण न देता निकाली काढण्याचे
सर्व अधिकार जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, कोल्हापूर यांनी राखून ठेवले असून अधिक
माहितीसाठी 0231-2665812 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असेही श्री.
खेडेकर यांनी पत्रकाव्दारे कळविले आहे.
000000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.