बुधवार, ४ मे, २०२२

सांस्कृतिक कार्य संचालनालय आयोजित “महा ताल उत्सव लोकवाद्यांचा” कार्यक्रमाचे आयोजन

 


 

कोल्हापूर दि. 4 (जिमाका) : राजर्षी छत्रपती शाहू महाराज स्मृती शताब्दी अंतर्गत सांस्कृतिक कार्य संचालनालय आयोजित महा ताल उत्सव लोकवाद्यांचा कार्यक्रमाचे आयोजन दिनांक 5 ते 7 मे 2022 या कालावधीत खासबाग मैदान, कोल्हापूर येथे करण्यात आले असल्याची माहिती सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक बिभिषण चवरे यांनी दिली आहे.

यामध्ये दि. 5 मे रोजी सायं. 6 ते 7 वाजता मामेखान टॉक्स अँड रुट्स,  7.30 ते 10 वाजता राकेश अँड फ्रेंडस हे कार्यक्रम होणार आहेत. दि. 6 मे रोजी सायं. 7.30 ते 10 वाजता सिवामणी ट्रायो व दि. 7 मे रोजी रात्री 8 ते 10 वा. कलर्स ऑफ रिदम असे कार्यक्रम होणार आहेत.

तसेच 125 पेक्षा जास्त दुर्मिळ वाद्यांचे भव्य प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.

0000000

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.