कोल्हापूर दि. 4 (जिमाका) : लोकराजा राजर्षी छत्रपती
शाहू महाराज स्मृती शताब्दी कृतज्ञता पर्वानिमित्त गुरुवार, ५ मे रोजी सकाळी ११ वाजता
जिल्ह्यात ‘जागर शाहू कर्तृत्वाचा’ या विषयावर
राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या जीवनकार्याविषयी एकाच वेळी शंभर व्याख्यानांचे
आयोजन केले आहे. या विशेष व्याख्यानमालेमध्ये शाहू महाराज यांचे कार्य आणि योगदान लोकांना
कळावे खास करून विद्यार्थ्यांच्या मनात शाहूंचे विचार रुजावेत यासाठी विवकानंद महाविद्यालय,
कोल्हापूर येथे पालकमंत्री सतेज पाटील यांचे व्याख्यान होणार आहे.
व्याख्यानमालेतील
मुख्य व्याख्यान शिवाजी विद्यापीठाच्या राजर्षी शाहू सिनेट सभागृहात होणार असून ख्यातनाम
अर्थ व कृषी तज्ज्ञ डॉ. यशवंतराव थोरात हे यावेळी ‘राजर्षी शाहू छत्रपती : जीवन व कार्य’
या विषयावर व्याख्यान देणार असून ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार अध्यक्षस्थान
भूषविणार आहेत. श्री शाहू छत्रपती महाराज, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, कुलसचिव डॉ.
व्ही. एन. शिंदे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.
जिल्हा
प्रशासनाच्या वतीने सकाळी ११ वाजता आयोजित या विशेष व्याख्यानमालेमध्ये कुलगुरु डॉ.
डी. टी. शिर्के रुकडी येथील राजर्षी शाहू कला व वाणिज्य महाविद्यालयात राजर्षी शाहू
महाराजांच्या योगदानाविषयी व्याख्यान देणार आहेत.
तर
प्र-कुलगुरू डॉ. पी.एस. पाटील हे चंदगड येथील आर.बी. माडखोलकर महाविद्यालयात व्याख्यान
देणार आहेत.
तर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे कराड मधील
एस. जी. एम कॉलेजमध्ये शाहू राजांबद्दल आपले विचार व्यक्त करणार आहेत.
या
व्याख्यानमालेत कोल्हापूर महानगरपालिका, विविध शिक्षण संस्था, जिल्हा परिषद शाळा, रयत
शिक्षण, बोर्डींग स्कूल, छत्रपती शाहू यांच्याशी
निगडित संस्था यामध्ये सहभागी होणार आहेत
. या व्याख्यानास शाहूप्रेमी, नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून लाभ घ्यावा,
असे आवाहन संयोजन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
0000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.