गुरुवार, १९ मे, २०२२

सैनिकी मुलींचे वसतिगृह व माजी सैनिक विश्रामगृहात तात्पुरत्या स्वरुपात कंत्राटी पध्दतीने भरती

 


 

कोल्हापूर, दि. 19 (जिमाका): जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय अखत्यारित सैनिकी मुलींचे वसतिगृह, कोल्हापूर व माजी सैनिक विश्रामगृह, कोल्हापूर करिता अशासकीय पदे तात्पुरत्या स्वरुपात कंत्राटी पध्दतीने भरावयाची आहेत. माजी सैनिकांना प्रथम प्राधान्य देण्यात येणार आहे. तरी इच्छुकांनी अर्ज दि. 5 जून पर्यंत जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, कोल्हापूर येथे जमा करावेत, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकाऱ्यांनी केले आहे.

        सैनिकी मुलींचे वसतिगृह, कोल्हापूर येथे चौकीदार-1, मानधन रु. 8 हजार 911 तर माजी सैनिक विश्रामगृह, कोल्हापूर येथे सफाईकामगार मानधन रु. 5 हजार 658 रु. इतके राहील.

            प्राप्त अर्जांची छाननी करुन पात्र उमेदवारांची मुलाखत शुक्रवार दि. 10 जून रोजी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात दुपारी 12 वाजता घेण्यात येईल. उमेदवार निवडीचे सर्व अधिकार जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांना राहतील. इतर अटी, शर्ती व सविस्तर माहितीसाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, कोल्हापूर येथे संपर्क साधावा, असेही आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकाऱ्यांनी केले आहे.

00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.