गुरुवार, १९ मे, २०२२

मौजे उंचगाव येथील दिलीप अर्जुना काजळे यांच्या हिस्स्याचा जाहीर लिलाव

 


            कोल्हापूर दि. 19 (जिमाका): मौजे उंचगाव ता. करवीर जि. कोल्हापूर येथील गट नं. 378/6 पैकी दिलीप अर्जुना काजळे रा. 17/ब, ई वॉर्ड १ ली गल्ली, विक्रमनगर ता. करवीर, जि. कोल्हापूर यांचे जि. कोल्हापूर यांच्या हिस्स्याचे क्षेत्र (0,00,38 चौ.मी.) चा जाहीर लिलाव तलाठी कार्यालय उंचगाव, ता. करवीर, जि. कोल्हापूर येथे दि. 24 मे रोजी सकाळी 11 वाजता आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती करवीरच्या तहसिलदार शीतल मुळे- भामरे यांनी दिली आहे.

            ही विक्री उक्त कसुरदारांच्या उक्त संपत्तीवरील अधिकार, हक्क आणि हित संबंध यांच्या पुरतीच मर्यादित आहे.

  लिलावाच्या शर्ती खालीलप्रमाणे आहेत-

मौजे उंचगाव, ता. करवीर जि. कोल्हापूर येथील गट नं. 378/6 पैकी दिलीप अर्जुना काजळे रा. 17/ ब, ई वॉर्ड १ ली गल्ली, विक्रमनगर ता. करवीर, जि. कोल्हापूर यांच्या हिस्सेचे क्षेत्र (0,00,38 चौ.मी.) मालमत्तेचे मुल्यांकन रु.  1 लाख 56 हजार 560  इतके असून यापेक्षा कमी बोली स्विकारली जाणार नाही.  लिलाव मंजूर अंतरावर पूर्ण केला जाईल. ज्यांच्या नावे लिलाव पूर्ण होईल त्याने ¼  रक्कम तात्काळ भरावयाची आहे. लिलाव मंजूर झाल्यानंतर लिलाव धारक यांना समज दिल्यापासून तीन दिवसात उर्वरित ¾  रक्कम जमा करावयाची आहे.   ¾ रक्कम न भरल्यास फेरलिलाव केला जाईल व त्यात बोली कमी आल्यास अशी कमी पडणारी रक्कम पूर्वी जमा केलेल्या १/४ रकमेतून वजा केली जाईल.  सक्षम अधिका-याकडून लिलाव मंजूर झाल्यानंतर विक्री प्रमाणपत्र दिले जाईल त्या आधारे लिलाव धारकास मिळकतीचा प्रत्यक्ष ताबा देण्यात येईल.

 

000000

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.