शुक्रवार, २० मे, २०२२

डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचे अर्ज भरण्यास मुदतवाढ

 

कोल्हापूर, दि. 20 (जिमाका): सन 2021-22 या शैक्षणिक वर्षातील वैद्यकीय अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया अजूनही सुरु आहे. अद्यापही ज्या विद्यार्थ्यांनी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचे अर्ज भरले नसतील त्या विद्यार्थ्यांसाठी 31 मे पर्यंत अर्ज सादर करण्यास मुदतवाढ दिली आहे, अशी माहिती समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त विशाल लोंढे यांनी केले आहे.

अनुसूचित जाती तथा नवबौद्ध घटकांतील 11 वी, 12 वी तसेच इयत्ता 12 वी नंतरच्या व्यवसायिक तसेच बिगर व्यवसायिक अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश मिळालेले जे विद्यार्थी मागासवर्गीय शासकीय वसतिगृहात प्रवेशास पात्र असलेल्या परंतु प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांना पुढील शिक्षण घेता यावे म्हणून भोजन, निवास, निर्वाह भत्ता व इतर शैक्षणिक सुविधा या विद्यार्थ्यांना स्वतः उपलब्ध करुन घेण्यासाठी आवश्यक रक्कम विद्यार्थ्याच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये थेट जमा करण्याकरिता सामाजिक न्याय व विशेष सहाय विभागामार्फत भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना राबविली जाते.

अधिक माहितीकरिता सहायक आयुक्त, समाजकल्याण कार्यालय, विचारे माळ, बाबर हॉस्पिटल शेजारी, कोल्हापूर येथे  ०२३१-२६५१३१८ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा.

00000000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.