कोल्हापूर दि. 4 (जिमाका): लोकराजा शाहू महाराज यांच्या स्मृती शताब्दी निमित्त आयोजित
केलेल्या कृतज्ञता पर्वामध्ये शाहू स्मृती
शताब्दी पूर्वसंध्येला आज 5 मे रोजी सायंकाळी 7 वाजता दसरा चौक ते शाहू समाधी स्थळ या मार्गावर कॅन्डल मार्च काढण्यात
येणार आहे. समतेचा संदेश देणाऱ्या शाहू महाराजांच्या स्मृतीला या अनोख्या उपक्रमातून अभिवादन करण्यात
येणार आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे या कॅन्डल
मार्च मध्ये शाहू महाराजांनी स्थापन केलेल्या कोल्हापुरातील सर्व समाजाच्या बोर्डिंग
मधील विद्यार्थी उपस्थित राहून शाहू महाराजांना आदरांजली वाहणार आहेत.
पालकमंत्री सतेज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा प्रशासनाच्या वतीने 18 एप्रिल पासून कोल्हापुरात
लोकराजा राजर्षी शाहू छत्रपती महाराज कृतज्ञता पर्वाच्या निमित्ताने विविध उपक्रम होत
आहेत.
सहा मे रोजी होणाऱ्या स्मृती
शताब्दी च्या मुख्य कार्यक्रमाच्या पूर्वसंध्येला हा कॅन्डल मार्च होत आहे. शाहू महाराजांनी
सर्व जाती धर्मातील विद्यार्थ्यांसाठी कोल्हापुरात बोर्डिंग सुरू केली होती. या बोर्डिंग मधील विद्यार्थी
हे सायंकाळी सात वाजता दसरा चौक येथील शाहू महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करणार आहेत.
याठिकाणी असलेल्या मशालीला मेणबत्ती पेटवून
हा कॅन्डल मार्च सुरू होणार आहे. दसरा चौक पासून
शाहू समाधी स्थळापर्यंत जाऊन या ठिकाणी शाहू महाराजांना आदरांजली वाहण्यात येणार
आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.