कोल्हापूर,
दि.20 (जिल्हा माहिती कार्यालय) : आज संध्याकाळी 5 वाजेपर्यंत आरटीपीसीआर आणि
सीबीएनएएटी चाचणीचे 2527 प्राप्त अहवालापैकी 2285 अहवाल निगेटिव्ह तर 231 अहवाल
पॉझिटिव्ह (11 अहवाल नाकारण्यात आले आहेत). अॅन्टीजेन टेस्टिंग चाचणीचे 6127 प्राप्त अहवालापैकी 5654 अहवाल निगेटिव्ह
तर 473 अहवाल पॉझिटिव्ह (674 अहवाल आरटीपीसीआरला पाठविण्यात आले आहेत). खासगी रुग्णालये/लॅब मध्ये 1019 प्राप्त अहवालापैकी 657 निगेटिव्ह तर 362
पॉझीटिव्ह असे एकूण 1066 अहवाल पॉझीटिव्ह आहेत तर एकूण 36 रूग्णांचा मृत्यू
झाला आहे.
जिल्ह्यात आज अखेर एकूण 1 लाख 41 हजार 460
पॉझीटिव्हपैकी 1 लाख 26 हजार 861 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आज अखेर
जिल्ह्यात एकूण 10 हजार 186 पॉझीटिव्ह रुग्ण आहेत.
आज संध्याकाळी 5 वाजेपर्यंत प्राप्त 1066 पॉझीटिव्ह
अहवालापैकी आजरा-16, भुदरगड-30, चंदगड-10, गडहिंग्लज-26, गगनबावडा-2, हातकणंगले-154,
कागल-38, करवीर-175, पन्हाळा-65, राधानगरी-38, शाहूवाडी-9, शिरोळ-65, नगरपरिषद
क्षेत्र-94, कोल्हापूर महापालिका क्षेत्र- 322, इतर जिल्हा व राज्यातील-22 असा
समावेश आहे.
आजअखेर तालुका, नपा आणि मनपा क्षेत्रनिहाय रुग्णांची संख्या पुढीलप्रमाणे -
आजरा-3422, भुदरगड- 3905, चंदगड- 3177, गडहिंग्लज- 5103, गगनबावडा- 601,
हातकणंगले-15278, कागल-4672, करवीर-19138, पन्हाळा- 6838, राधानगरी-3059,
शाहूवाडी-3220, शिरोळ- 8712, नगरपरिषद क्षेत्र-16556, कोल्हापूर महापालिका 39 हजार
928 असे एकूण 1
लाख 33 हजार 609 आणि इतर जिल्हा व राज्यातील – 7 हजार 851 असे मिळून एकूण 1 लाख 41 हजार
460 रुग्णांची आजअखेर जिल्ह्यात संख्या आहे.
जिल्ह्यातील एकूण 1 लाख 41 हजार 460 पॉझीटिव्ह रूग्णांपैकी 1 लाख 26 हजार 861
रूग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे. तर एकूण 4 हजार 413 जणांचा मृत्यू झाला
असल्यामुळे आजअखेर उपचारार्थ दाखल झालेल्या जिल्ह्यातील रूग्णांची संख्या 10 हजार 186 इतकी आहे.
0000000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.