कोल्हापूर, दि. 14 (जिल्हा माहिती कार्यालय) : सन 2020-21 या शैक्षणिक वर्षात इयत्ता 10 वी व 12 वी मध्ये परीक्षेस प्रविष्ठ होणाऱ्या खेळाडू, विद्यार्थ्यांना सवलतीचे गुण मिळण्यासाठी दिनांक 14 जून पासून दुपारी 3 ते 5 या वेळेतच दोन प्रतित प्रस्ताव सादर करावेत.
कोविड-19 या रोगामुळे उद्भवलेल्या असामान्य परिस्थितीमुळे सन 2020-21 या वर्षात माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इयत्ता 10 वी) परीक्षेस प्रविष्ठ विद्यार्थ्याच्या बाबतीत इयत्ता 8 वी व 9 वी मधील क्रीडा स्पर्धेतील सहभागी खेळाडू व सन 2020-21 या वर्षा उच्च माध्यमिक प्रमाणपत्र इयत्ता 12 वी परीक्षेस प्रविष्ठ होणाऱ्या या खेळाडू विद्यार्थ्यांचे इयत्ता 11 वी मधील स्पर्धेतील कामगिरी ग्राह्य धरुन खेळाडूचे वाढीव ग्रेसगुण परिपूर्ण विहीत नमुन्यातील प्रस्ताव माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांनी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाकडे सादर करावेत, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी डॉ. चंद्रशेखर साखरे यांनी केले आहे.
00000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.