शुक्रवार, २५ जून, २०२१

नव्याने नोंदणी झालेल्या सर्व नव मतदारांनी e-EPIC चा लाभ घ्यावा

 


कोल्हापूर, दि. 25 (जिल्हा माहिती कार्यालय): भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार दिनांक 01 जानेवारी, 2021 या अर्हता दिनांकावर आधारित मतदार याद्यांचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम हाती घेण्यात आला होता. कार्यक्रमांतर्गत दिनांक 16 नोव्हेंबर, 2020 ते दिनांक 15 डिसेंबर, 2020 या कालावधीत मतदार यादीत नव्याने नांव नोंदणी केलेल्या नव मतदार व एकल भ्रमनध्वनी क्रमांक असलेल्या मतदारांना आयोगाने e-EPIC ऑनलाईन पध्दतीने डाऊनलोड करण्यासाठी उपलब्ध करुन दिले आहे. e-EPIC करिता संबंधित मतदारांनी आयोगाच्या www.nvsp.in या संकेतस्थळावर भेट द्यावी किंवा Voter Helpline App चा वापर करावा. या सेवेचा लाभ नव्याने नोंदणी झालेल्या सर्व नव मतदारांनी घ्यावा, असे आवाहन उपजिल्हाधिकारी तथा उपजिल्हा निवडणूक अधिकारी भगवान कांबळे यांनी  केले आहे.

e-EPIC डाऊनलोड करताना काही अडचणी उध्दभवल्यास शासकीय कामकाजाच्या दिवशी उपजिल्हाधिकारी तथा उपजिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालय, कोल्हापूर यांचा कार्यालयीन दूरध्वनी क्रमांक 0231-2658316 येथे संपर्क साधावा किंवा आपल्या तालुक्यातील तहसिल कार्यालयातील निवडणूक शाखेला भेट द्यावी. कोल्हापूर शहराच्या हद्दीतील मतदारांनी एल.बी.टी.शाखा, शिवाजी मार्केट, कोल्हापूर महानगरपालिका, कोल्हापूर येथे भेट द्यावी किंवा कोल्हापूर महानगरपालिकेचा दूरध्वनी क्रमांक 0231-2540291 येथे संपर्क साधावा.

00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.