कोल्हापूर, दि. 26 (जिल्हा माहिती कार्यालय) : वसतीगृहांचे शहर अशी कोल्हापूर शहराची ओळख
राजर्षी शाहू महाराजांनी निर्माण केली. त्यामुळे कोल्हापूरास वसतिगृहाची जननी असे
संबोधिले जाते. समाज कल्याण विभाग, जिल्हा परिषद, कोल्हापूर यांच्या अधिनस्त
कोल्हापूर जिल्हयातील कार्यरत असणाऱ्या 46 वसतिगृहांसाठी सन 2021-22 जिल्हा
वार्षिक योजनेंतर्गत नाविण्यपूर्ण योजनेमधून विद्यार्थ्याकरीता निवासाची सोय होणार
असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री सतेज पाटील यांनी केले.
26 जून हा दिवस राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचा जन्म
दिन ‘सामाजिक न्यायदिन’ म्हणून साजरा केला जातो. या दिनाचे औचित्य साधून श्री देवी
इंदुमती बोर्डींग या वसतीगृहाच्या नवीन इमारतीचा अर्पण सोहळा श्रीमंत शाहू महाराज
यांच्या शुभहस्ते व पालकमंत्री सतेज पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला.
यावेळी
बोलताना पालकमंत्री म्हणाले, राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचे मागासवर्गीय
कल्याणाबाबत उदात्त धोरण होते. असेच धोरण राज्य शासनाचे असून या वसतिगृहात
राहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी बंकबेड तसेच
विद्यार्थ्याना ऑनलाईन शिक्षणासाठी प्रत्येक वसतिगृहांस 5 संगणक, 1 प्रिंटर व 1
स्मार्ट टिव्ही संच, वसतिगृहातील विद्यार्थ्यांना आंघोळीच्या गरम पाण्याची सोयीसाठी
सोलर वॉटर हिटर सिस्टिम आदी सुविधा देण्यात येतील. त्याचबरोबर वसतिगृहाचे कर्मचारी हे अनेक वर्षापासून
मानधनावर काम करीत असून त्यांना नियमित वेतनश्रेणी लागू होण्याबाबत व वसतिगृहांना
देण्यात येणाऱ्या विद्यार्थी परिपोषन अनुदानापोटी 1500 रुपयांची वाढ करण्यासाठी
शासन स्तरावर प्रयत्न करणार असल्याचेही श्री. पाटील यांनी यावेळी सांगितले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.