मंगळवार, ३१ ऑगस्ट, २०२१

राज्य सेवा पूर्व परिक्षा येत्या शनिवारी

 

 


                कोल्हापूर, दि. 31 (जिल्हा माहिती कार्यालय) : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणारी राज्य सेवा पूर्व परिक्षा येत्या शनिवारी म्हणजेच 4 सप्टेंबर रोजी सकाळी 11 ते 12 या वेळेत घेण्यात येणार आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे यांनी दिली.

राज्य सेवा परीक्षेसाठी सुमारे 19 हजार 776 परीक्षार्थी बसणार असून शहरातील महाविद्यालये व हायस्कूल अशा एकूण 58 उपकेंद्रावर परीक्षेची बैठक व्यवस्था करण्यात आली आहे.

       परीक्षेकरिता उमेदवारांनी परीक्षा सुरु होण्यापूर्वी तीन तास अगोदर केंद्रावर उपस्थित राहणे अनिवार्य आहे. तसेच उमेदवारांनी त्यांचे मुळ ओळखपत्र (आधार कार्ड/ पॅन क्रमांक/ फोटो) व प्रवेश प्रमाणपत्र झेरॉक्स प्रत सोबत ठेवावी. उमेदवारांनी कोविड-19 चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मास्क वापरणे व सॅनिटायझर जवळ ठेवणे अनिवार्य आहे.

000000

सोमवारी लोकशाही दिन

 

 


कोल्हापूर, दि. 31 (जिल्हा माहिती कार्यालय) : जिल्हास्तरीय लोकशाही दिन सोमवार दि. 6 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वा. जिल्हाधिकारी कार्यालयातील छत्रपती शिवाजी सभागृहात जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आला आहे.

लोकशाही दिनाचा लाभ जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी घ्यावा, तसेच शासनाकडील दिनांक 26 सप्टेंबर 2012 रोजीच्या शासन परिपत्रकान्वये तक्रार, निवेदन वैयक्तिक स्वरूपाचे असावे. परंतु न्यायप्रविष्ठ प्रकरणे, राजस्व, अपिल्स, सेवाविषयक,आस्थापना विषयक बाबी, अंतिम उत्तर दिलेले आहे, देण्यात येणार आहे. अशा प्रकरणी पुन्हा त्याच विषयात केलेले अर्ज लोकशाही दिनात स्विकृत करण्यात येणार नाहीत याची सर्वांनी नोंद घ्यावी, असे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

000000

गटई कामगारांना लोखंडी पत्र्याचे स्टॉल वाटप योजना

 


कोल्हापूर, दि. 31 (जिल्हा माहिती कार्यालय) : सामाजिक न्याय विभागामार्फत 100 टक्के शासकीय अनुदानावर गटई कामगारांना लोखंडी पत्र्याचे स्टॉल पुरविणे योजना ग्रामपंचायत व अ,ब,क वर्ग नगरपालिका आणि छावणी क्षेत्र व महानगरपालिका क्षेत्रात योजना राबविण्याचा निर्णय सन 2007-08 पासून शासनाने घेतलेला आहे. या योजनेंतर्गत गटई कामगारांना 100 टक्के अनुदानावर मोफत पत्र्याचा स्टॉल व 500 रू. चे अनुदान दिले जाते.

या योजनेसाठी अटी व शर्ती पुढीलप्रमाणे-

अर्जदार हा महाराष्ट्राचा रहिवासी व अनुसूचित जातीचा असावा. अर्जदाराच्या कुटूंबाचे वार्षिक उत्पन्न हे ग्रामीण भागात 40 हजार रू. व शहरी भागात 50 हजार रू. पेक्षा अधिक नसावे. अर्जदाराचे वय 18 पेक्षा कमी नसावे. अर्जदार ज्या जागेत गटई स्टॉल मागत असेल ती जागा ग्रामपंचायत, नगरपालिका, छावणी बोर्ड किंवा महानगरपालिका यांनी त्यास भाड्याने, कराराने, खरेदीने अगर मोफत परंतू अधिकृतरित्या ताब्यात दिलेली असावी किंवा ती त्यांची स्वमालकीची जागा असावी. एखाद्या लाभार्थ्यांना स्टॉलचा ताबा दिल्यानंतर त्या स्टॉलची देखभाल दुरुस्ती लाभार्थ्यांने स्वत: करणे आवश्यक राहील. गटई पत्र्याचे स्टॉल हे एका घरात एकाच व्यक्तीला दिले जाईल. स्टॉल वाटपाबाबतचे पत्र लाभार्थ्यांच्या फोटोसह स्टॉलमध्ये प्रथमदर्शनी भागावर लावणे बंधनकारक राहील. एकदा गटई स्टॉलचे वाटप झाल्यानंतर या स्टॉलची विक्री करता येणार नाही तसेच भाडे तत्वावर देता येणार नाही तसेच स्टॉलचे हस्तांतरण करता येणार नाही.

यापूर्वी ज्या कुटूंबाने या योजनेचा लाभ घेतला आहे त्यांनी अर्ज करू नयेत. अधिक माहिती व अर्जासाठी सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, कोल्हापूर या कार्यालयात संपर्क साधावा, असे आवाहन समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त विशाल लोंढे यांनी केले.

000000

राधानगरी येथे 3.5 मिमी पाऊस

 

                कोल्हापूर, दि. 31 (जिल्हा माहिती कार्यालय) : जिल्ह्यात राधानगरी तालुक्यात 3.5 मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.

जिल्ह्यात आज दुपारी 11 वाजेपर्यंत पडलेल्या एकूण पावसाची तालुका निहाय आकडेवारी मिमीमध्ये पुढीलप्रमाणे आहे. हातकणंगले- 0.2, शिरोळ- निरंक, पन्हाळा- 0.1, शाहूवाडी- 0.3, राधानगरी -3.5, गगनबावडा- 1.0, करवीर- निरंक, कागल- 0.4, गडहिंग्लज- 0.3, भुदरगड-0.8, आजरा-0.6  मिमी व  चंदगड- 1.2  पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.

000000

 

सोमवार, ३० ऑगस्ट, २०२१

 

शिष्यवृत्ती परीक्षेची उत्तरसूची परिषदेच्या संकेतस्थळावर प्रसिध्द

 

                कोल्हापूर, दि. 30 (जिल्हा माहिती कार्यालय) : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत दि. 12 ऑगस्ट 2021 रोजी घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक (इ. ५ वी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. 8 वी) या परीक्षेची इयत्तानिहाय, पेपरनिहाय अंतरिम (तात्पुरती) उत्तरसूची परिषदेच्या  www.mscepune.in  व  https://www.mscepuppss.in या संकेतस्थळावर परीक्षार्थी, मार्गदर्शक, शिक्षक, पालक, शाळा आणि क्षेत्रिय अधिकारी यांच्यासाठी प्रसिध्द करण्यात आली असल्याचे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे यांनी कळविले आहे.             

            अंतरिम उत्तरसूचीवरील आक्षेप नोंदविण्याची कार्यपध्दती याप्रमाणे- अंतरिम उत्तरसूचीवर काही आक्षेप असल्यास त्याबाबतचे निवेदन परिषदेच्या संकेतस्थळावरुन ऑनलाईन सादर करावे. ऑनलाईन निवेदन पालकांकरीता संकेतस्थळावर व शाळाकरीता त्यांच्या लॉगिनमध्ये onbjection Question Paper & Interim Answer Key या हेडिंगखाली उपलब्ध करून देण्यात आले आहे.  त्रुटी / आक्षेपाबाबतचे ऑनलाईन निवेदन भरण्याकरीता दिनांक 2 सप्टेंबर 2021 पर्यंत मुदत आहे.  दि. 02 सप्टेंबरनंतर त्रुटी / आक्षेपाबाबतचे निवेदन स्वीकारले जाणार नाही. ऑनलाईन निवेदनाशिवाय इतर कोणत्याही प्रकारे (टपाल, समक्ष अथवा ईमेलव्दारे) प्राप्त त्रुटी/ आक्षेपाबाबतच्या निवेदनाचा विचार केला जाणार नाही.  विहीत मुदतीत प्राप्त झालेल्या ऑनलाईन निवेदनांना वैयक्तिकरित्या उत्तर पाठविले जाणार नाही.  विहित मुदतीत प्राप्त झालेल्या ऑनलाईन निवेदनांवर संबंधित विषय तज्ज्ञांचे अभिप्राय घेवून अंतिम उत्तरसूची परिषदेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल.

            ऑनलाईन आवेदनपत्र व शाळा माहिती प्रपत्रातील माहितीत दुरुस्ती करण्याकरीताची कार्यपद्धती याप्रमाणे विद्यार्थ्यांच्या अनलाईन आवेदनपत्रातील माहिती व शाळा माहिती प्रपत्रात (विद्यार्थ्यांचे नाव, आडनाव, वडीलांचे नाव, आईचे नाव, लिंग, शहरी / ग्रामीण इत्यादी) दुरुस्ती करण्यासाठी दि. 2 सप्टेंबरपर्यंत  शाळांच्या लॉगीनमध्ये ऑनलाईन अर्ज उपलब्ध करुन देण्यात आलेला आहे. अर्ज ऑनलाईन व्यतिरिक्त अन्य कोणत्या पध्दतीने पाठविल्यास स्वीकारले जाणार नाहीत. विहित मुदतीनंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही, असे प्रसिध्दी पत्रकात नमुद आहे.

 0 0 0 0 0 0 0

 





तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने आरोग्य विभागाने

सुक्ष्म नियोजन करावे - पालकमंत्री सतेज पाटील

कोल्हापूर, दि. 30 (जिल्हा माहिती कार्यालय) : येत्या 15 ऑक्टोबरपर्यंत कोरोनाची तिसरी लाट येऊ शकेल असा इशारा वैद्यकीय तज्ज्ञांनी दिला आहे. याचा सर्वाधिक धोका लहान मुलांना असल्याचे समजते. त्या दृष्टीने आत्तापासून आरोग्य विभागाने ही संभाव्य लाट थोपविण्यासाठी सूक्ष्म नियोजन (मायक्रो प्लॅनिंग) करावे असे निर्देश पालकमंत्री सतेज पाटील यांनी दिले.

       तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयातील राजर्षी शाहूजी सभागृहात जिल्ह्यातील सर्व प्रांताधिकारी, तहसिलदार, गट विकास अधिकारी यांच्याशी आज पालकमंत्र्यांनी ऑनलाईन संवाद साधला.

            ते पुढे म्हणाले, आरोग्य विभागाने दुसऱ्या लाटेचे अचुक विश्लेषण करावे. जेणेकरुन तिसऱ्या लाटेचा मुकाबला करण्यासाठी याचा उपयोग होवू शकेल. हॉस्पिटलचे बेड मॅनेटमेंट (खाट व्यवस्थापन) जिल्हा प्रशासनाने स्वत:च्या ताब्यात ठेवावे. कोल्हापूर जिल्ह्यात 12 ऑक्सीजन प्लॅन्टची उभारणी पूर्णत्वाकडे जात असल्याने ऑक्सीजनबाबत कोल्हापूर जिल्हा लवकरच स्वंयपूर्ण होईल असा आशावाद व्यक्त करुन चंदगड आणि गारगोटीला ऑक्सीजन प्लॅन्ट तयार करण्याचे नियोजन करावे, असे निर्देश पालकमंत्र्यांनी यावेळी दिले.

            तिसऱ्या लाटेचा मुकाबला करण्यासाठी लागणाऱ्या अतिरिक्त मनुष्यबळाबाबत आपण स्वत: आरोग्य मंत्री आणि आरोग्य सचिवांशी बोलणार असल्याचे श्री. पाटील यांनी सांगितले. तर या लाटेचा मुकाबला करण्यासाठी प्रायव्हेट हॉस्पिटलाचा (खासगी रुग्णालय) सपोर्ट घ्या.  दि. 7 ऑक्टोबरपूर्वी आरोग्य विभागाने याची संपूर्ण तयारी करावी तसेच व्हॅक्सीनेशनबाबत काही अडचण येत असल्यास जिल्हा प्रशासनाला कळविण्यात यावे. इन्फ्रास्टक्यरसह आरोग्य विभागाने प्लॅनिंग करावे. तसेच खासगी रुग्णालयाला DCH, CCC मध्ये कनव्हर्ट करण्यासाठी प्रयत्न करा, अशा सूचना जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांनी या बैठकीत दिल्या.

            तत्पुर्वी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे यांनी दुसऱ्या लाटेत आरोग्य विभागाने केलेल्या कामाबाबत तसेच तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाची पूर्व तयारी याबाबत माहिती दिली.

            या बैठकीत जिल्ह्यातील प्रांताधिकारी, तहसिलदार, गट विकास अधिकारी यांच्याशी पालकमंत्र्यांनी विस्तृत संवाद साधून त्यांच्या मागण्या व अडचणीबाबत विचारणा केली. यावेळी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, अपर जिल्हाधिकारी किशोर पवार, निवासी उपजिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे, महापालिका उपायुक्त निखील मोरे, वैद्यकीय अधिष्ठाता डॉ. एस.एस.मोरे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अनिल माळी, अपर पोलीस अधीक्षक तिरुपती काकडे, डॉ. ऊषादेवी कुंभार, उपजिल्हाधिकारी आश्विनी जिरंगे आदी उपस्थित होते.

 0 0 0 0 0 0

शनिवार, २८ ऑगस्ट, २०२१

आजअखेर 1 लाख 96 हजार 370 जणांना डिस्चार्ज

 


             कोल्हापूर, दि. 28 (जिल्हा माहिती कार्यालय) : आज संध्याकाळी  5 वाजेपर्यंत आरटीपीसीआर आणि सीबीएनएएटी चाचणीचे 3886 प्राप्त अहवालापैकी 3867 अहवाल निगेटिव्ह (12 अहवाल नाकारण्यात आले) तर 7 अहवाल पॉझिटिव्ह. अॅन्टीजेन टेस्टिंग चाचणीचे 889 प्राप्त अहवालापैकी 856 अहवाल निगेटिव्ह तर 33 अहवाल पॉझिटिव्ह (100 अहवाल आरटीपीसीआरला पाठवण्यात आले आहेत). खासगी रुग्णालये/लॅब मध्ये 7317 प्राप्त अहवालापैकी 7196 निगेटिव्ह तर 121 पॉझीटिव्ह असे एकूण 161 अहवाल पॉझीटिव्ह आहेत तर एकूण 2 रूग्णांचा मृत्यू झाला आहे.

            जिल्ह्यात आज अखेर एकूण 2 लाख 3 हजार 553 पॉझीटिव्हपैकी 1 लाख 96 हजार 370 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आज अखेर जिल्ह्यात एकूण 1 हजार 495 पॉझीटिव्ह रुग्ण आहेत.

            आज संध्याकाळी 5 वाजेपर्यंत प्राप्त 161 पॉझीटिव्ह अहवालापैकी आजरा-2, भुदरगड-3, चंदगड-1, गडहिंग्लज-10, गगनबावडा-0,  हातकणंगले-45, कागल-3, करवीर-20, पन्हाळा-5, राधानगरी-0, शाहूवाडी-11, शिरोळ-10, नगरपरिषद क्षेत्र-25, कोल्हापूर महापालिका क्षेत्र-21, इतर जिल्हा व राज्यातील-5 असा समावेश आहे.

            आजअखेर तालुका, नपा आणि मनपा क्षेत्रनिहाय रुग्णांची संख्या पुढीलप्रमाणे - आजरा-5401, भुदरगड- 5097, चंदगड- 3888, गडहिंग्लज- 7486, गगनबावडा-724, हातकणंगले-23140, कागल-7952, करवीर-31409, पन्हाळा-10704, राधानगरी-4982, शाहूवाडी-4968, शिरोळ- 13488, नगरपरिषद क्षेत्र-22199, कोल्हापूर महापालिका 53 हजार 115 असे एकूण 1 लाख 94 हजार 932 आणि इतर जिल्हा व राज्यातील – 8 हजार 621 असे मिळून एकूण 2 लाख 3 हजार 553 रुग्णांची आजअखेर जिल्ह्यात संख्या आहे.

            जिल्ह्यातील एकूण 2 लाख 3 हजार 553 पॉझीटिव्ह रूग्णांपैकी 1 लाख 96 हजार 370 रूग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे. तर एकूण 5 हजार 688 जणांचा मृत्यू झाला आहे. आजअखेर उपचारार्थ दाखल झालेल्या जिल्ह्यातील रूग्णांची संख्या 1 हजार 495 इतकी आहे.

00000

 

इचलकरंजी बंधारा पाण्याखाली

 


          कोल्हापूर, दि. 28 (जिल्हा माहिती कार्यालय) : जिल्ह्यातील राधानगरी धरणात 226.85 दलघमी पाणीसाठा आहे. 

पंचगंगा नदीवरील-  इचलकरंजी हा एक बंधारा पाण्याखाली आहे.

जिल्ह्यातील धरणांमध्ये  राधानगरी-226.85, तुळशी -98.20, वारणा -897.84, दूधगंगा-670.61, कासारी- 70.88, कडवी -69.74, कुंभी-71.17, पाटगाव 97.95, चिकोत्रा- 42.99, चित्री -53.03, जंगमहट्टी -31.41, घटप्रभा -27.11, जांबरे- 23.23 (पूर्ण क्षमतेने भरला), आंबेआहोळ - 30.98 इतका दलघमी पाणीसाठा शिल्लक आहे.

          तर बंधाऱ्यांची पाणी पातळी पुढीलप्रमाणे -राजाराम 12, फूट, सुर्वे 14.8, रुई 40, इचलकरंजी 36, तेरवाड 34.6, शिरोळ -26.6  तर नृसिंहवाडी  बंधाऱ्याची  23 फूट इतकी पाणी पातळी आहे.

00000

कागल येथे 9 मिमी पाऊस

 


                कोल्हापूर, दि. 28 (जिल्हा माहिती कार्यालय) : जिल्ह्यात कागल तालुक्यात 9 मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.

जिल्ह्यात आज दुपारी 11 वाजेपर्यंत पडलेल्या एकूण पावसाची तालुका निहाय आकडेवारी मिमीमध्ये पुढीलप्रमाणे आहे. हातकणंगले- 7.1, शिरोळ- 4.4, पन्हाळा- 1.5, शाहूवाडी- 4.4, राधानगरी -8.1, गगनबावडा- 1.8, करवीर- 2.0, कागल- 9.0, गडहिंग्लज- 3.9, भुदरगड-1.9, आजरा-2.7  मिमी व  चंदगड- 1.4  पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.

प्रसिद्ध केला.

शुक्रवार, २७ ऑगस्ट, २०२१

आजअखेर 1 लाख 96 हजार 188 जणांना डिस्चार्ज


 

             कोल्हापूर, दि. 27 (जिल्हा माहिती कार्यालय) : आज संध्याकाळी  5 वाजेपर्यंत आरटीपीसीआर आणि सीबीएनएएटी चाचणीचे 3960 प्राप्त अहवालापैकी 3946 अहवाल निगेटिव्ह (5 अहवाल नाकारण्यात आले) तर 9 अहवाल पॉझिटिव्ह. अॅन्टीजेन टेस्टिंग चाचणीचे 947 प्राप्त अहवालापैकी 892 अहवाल निगेटिव्ह तर 55 अहवाल पॉझिटिव्ह (90 अहवाल आरटीपीसीआरला पाठवण्यात आले आहेत). खासगी रुग्णालये/लॅब मध्ये 4610 प्राप्त अहवालापैकी 4471 निगेटिव्ह तर 139 पॉझीटिव्ह असे एकूण 203 अहवाल पॉझीटिव्ह आहेत तर एकूण 2 रूग्णांचा मृत्यू झाला आहे.

            जिल्ह्यात आज अखेर एकूण 2 लाख 3 हजार 392 पॉझीटिव्हपैकी 1 लाख 96 हजार 188 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आज अखेर जिल्ह्यात एकूण 1 हजार 518 पॉझीटिव्ह रुग्ण आहेत.

            आज संध्याकाळी 5 वाजेपर्यंत प्राप्त 203 पॉझीटिव्ह अहवालापैकी आजरा-8, भुदरगड-1, चंदगड-1, गडहिंग्लज-4, गगनबावडा-0,  हातकणंगले-42, कागल-7, करवीर-25, पन्हाळा-6, राधानगरी-3, शाहूवाडी-6, शिरोळ-27, नगरपरिषद क्षेत्र-30, कोल्हापूर महापालिका क्षेत्र-40, इतर जिल्हा व राज्यातील-3 असा समावेश आहे.

            आजअखेर तालुका, नपा आणि मनपा क्षेत्रनिहाय रुग्णांची संख्या पुढीलप्रमाणे - आजरा-5399, भुदरगड- 5094, चंदगड- 3887, गडहिंग्लज- 7478, गगनबावडा-724, हातकणंगले-23095, कागल-7949, करवीर-31389, पन्हाळा-10699, राधानगरी-4982, शाहूवाडी-4957, शिरोळ- 13478, नगरपरिषद क्षेत्र-22174, कोल्हापूर महापालिका 53 हजार 94 असे एकूण 1 लाख 94 हजार 776 आणि इतर जिल्हा व राज्यातील – 8 हजार 616 असे मिळून एकूण 2 लाख 3 हजार 392 रुग्णांची आजअखेर जिल्ह्यात संख्या आहे.

            जिल्ह्यातील एकूण 2 लाख 3 हजार 392 पॉझीटिव्ह रूग्णांपैकी 1 लाख 96 हजार 188 रूग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे. तर एकूण 5 हजार 686 जणांचा मृत्यू झाला आहे. आजअखेर उपचारार्थ दाखल झालेल्या जिल्ह्यातील रूग्णांची संख्या 1 हजार 518 इतकी आहे.

00000


इचलकरंजी बंधारा पाण्याखाली

 


          कोल्हापूर, दि. 27 (जिल्हा माहिती कार्यालय) : जिल्ह्यातील राधानगरी धरणात 226.74 दलघमी पाणीसाठा आहे. 

पंचगंगा नदीवरील-  इचलकरंजी हा एक बंधारा पाण्याखाली आहे.

जिल्ह्यातील धरणांमध्ये  राधानगरी-226.74, तुळशी -98.10, वारणा -896.68, दूधगंगा-670.28, कासारी- 70.39, कडवी -70.12, कुंभी-70.73, पाटगाव 97.80, चिकोत्रा- 42.86, चित्री -52.98, जंगमहट्टी -31.41, घटप्रभा -27.98, जांबरे- 23.23 (पूर्ण क्षमतेने भरला), आंबेआहोळ - 30.98 इतका दलघमी पाणीसाठा शिल्लक आहे.

          तर बंधाऱ्यांची पाणी पातळी पुढीलप्रमाणे -राजाराम 12, फूट, सुर्वे 14.6, रुई 40, इचलकरंजी 35.9, तेरवाड 35.3, शिरोळ -27.6  तर नृसिंहवाडी  बंधाऱ्याची  24 फूट इतकी पाणी पातळी आहे.

00000

 

हंगामातील प्रतिकूल परिस्थितीत झालेले नुकसान निश्चित करण्याबाबत जाहीर सूचना

 


 

कोल्हापूर, दि. 27 (जि.मा.का.) : खरीप हंगाम 2020-21 पासून 2022-23 पर्यंत प्रधानमंत्री पिक विमा योजनेची अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकांसाठी, विमा क्षेत्र घटक धरुन अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामध्ये शेतक-यांस टाळता येण्याजोग्या कारणामुळे झालेल्या नुकसानीस विमा संरक्षणाच्या बाबी नमुद केलेल्या आहेत. ज्या अधिसूचित क्षेत्रामध्ये हंगामातील प्रतिकुल परिस्थिती, मात्र सर्वसाधारण काढणीच्या 15 दिवस आधीपर्यंत पूर, पावसातील खंड, दुष्काळ इ. बाबींमुळे शेतक-याच्या अपेक्षित उत्पादनामध्ये सरासरी उत्पादनाच्या 50 टक्के पेक्षा जास्त घट अपेक्षित असल्यास विमा संरक्षण देय होईल, असे नमूद आहे. या बाबत जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या जिल्हास्तरीय समितीच्या बैठकीत 5 टक्के क्षेत्राचे सर्वेक्षण करण्याचे आदेश प्र. जिल्हाधिकारी तथा प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या जिल्हा स्तरीय आढावा समितीचे अध्यक्ष किशोर पवार यांनी दिले आहेत.

खरीप हंगाम 2021 मध्ये शिरोळ तालुक्यातील एकूण 7 पैकी 6 महसूल मंडळामध्ये, दि. 22 ते 25 जुलै 2021 या कालावधीत अतिवृष्टी, धरणातील अतिरिक्त पाण्याचा विसर्ग, नद्या नाल्यांची वाढलेली  पाण्याची पातळी यामुळे शिरोळ तालुक्यातील शिरोळ, नृसिंहवाडी, जयसिंगपूर, शिरढोण, दत्तवाड कुरूंदवाड या  अधिसूचित क्षेत्रात अतिवृष्टी पूराचे पाणी शिरुन अधिसूचित पिकांच्या नुकसानीचा समावेश आहे.

अधिसूचित महसूल मंडळातील, अधिसूचित पिकांच्या नुकसानीच्या मार्गदर्शक सुचनेप्रमाणे सर्व्हेक्षणानुसार 6 महसूल मंडळ/मंडळ गटात सोयाबीन भुईमूग या पिकांची उत्पादकता 50 टक्के पेक्षा कमी अपेक्षित / येणार आहे असे निदर्शनास आले आहे.

तपशील खालीलप्रमाणे-

 

नं.

तातालुका

अधिसूचित पिक

अधिसूचित क्षेत्र/

महसूल मंडल गट

सरासरी उत्पादकता कि./हे.

प्रत्यक्ष अपेक्षित उत्पादकता कि./हे.

%

1

fशिरोळ

सोयाबीन

शिरोळ +नृसिहवाडी

2072.8

 0.00

0.00

जयसिंगपूर + नांदणी

1818.6

573.07 (जयसिंगपूर मंडळ)

31.51

शिरढोण+दत्तवाड+ कुरूंदवाड

1703.3

0.00

0.00

2

fशिरोळ

भुईमूग

शिरोळ + नृसिहवाडी + नांदणी + जयसिंगपूर 

1330.9

383.33 (जयसिंगपूर मंडळ)

0.00 (शिरोळ मंडळ)

0.00(नृसिहवाडी मंडळ) 

28.80

0.00

0.00

शिरढोण+दत्तवाड+ कुरूंदवाड

1209.0

0.00

0.00

हंगामातील प्रतिकुल परिस्थितीत नुकसान भरपाई निश्चित करण्यासाठी जाहिर सूचना काढण्यात येत आहे. त्यानुसार वरील अधिसूचित महसूल मंडळातील ज्या शेतक-यांनी सोयाबीन व भूईमूग पिक विमा हप्ता

रक्कम 23 जुलै 2021 अखेर अथवा त्यापुर्वी भरली आहे किंवा त्यांच्या खात्यातून विमा हप्ता रक्कम वजा करुन घेण्यात आलेली आहे, असेच शेतकरी मदतीसाठी पात्र राहातील. तसेच अपेक्षित नुकसान भरपाई रक्कमेच्या 25 टक्के मर्यादेपर्यंत नुकसान भरपाईची रक्कम आगावू देण्याचे निश्चित करण्यात येत आहे ही मदत अंतिम येणा-या नुकसान भरपाई रक्कमेतून समायोजीत करण्यात येईल.

कृषि व पशुसंवर्धन दुग्धव्यसाय विकास व मत्स्यव्यवसाशासन निर्णयानुसार हंगामातील प्रतिकुल परिस्थितीत  नुकसान भरपाई निश्चित करण्यासाठी 5 अधिसूचित क्षेत्रातील शिरोळ, नृसिंहवाडी, जयसिंगपूर, शिरढोण, दत्तवाड व कुरूंदवाड अशा एकूण 6 महसूल मंडळासाठी अधिसूचना निर्गमित करण्यात येत आहे.

000000