बुधवार, १८ ऑगस्ट, २०२१

माजी सैनिकांना सेवा प्रदाता प्रवर्गासाठी अर्ज करण्याचे आवाहन

 


कोल्हापूर, दि. 18 (जिल्हा माहिती कार्यालय) : इंडियन ऑईल कॉर्पोरेशन बांद्रा, कुर्ला कॉम्लेक्स येथील कोको पंपकरिता माजी सैनिक अधिकारी/ जे.सी.ओ. प्रवर्गामधील सेवा प्रदाता (सर्व्हीस प्रोव्हाईडर) नियुक्त करावयाचा असून इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लि. मुंबई डिव्हिजन, मुंबई-18 यांनी इच्छुक माजी सैनिक अधिकारी/ जे.सी.ओ. यांचा तपशिल 5 सप्टेंबर पर्यंत मागविला आहे.

याबाबतची विस्तृत माहिती तथा अर्ज www.iocl.com या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. इच्छुक माजी सैनिक/ जे.सी.ओ. यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकाऱ्यांनी केले आहे.

000000

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.