कोल्हापूर, दि. 21 (जिल्हा माहिती कार्यालय) : आज संध्याकाळी
5 वाजेपर्यंत आरटीपीसीआर आणि सीबीएनएएटी चाचणीचे 3901 प्राप्त अहवालापैकी 3876
अहवाल निगेटिव्ह (7 अहवाल नाकारण्यात आले) तर 18 अहवाल पॉझिटिव्ह. अॅन्टीजेन
टेस्टिंग चाचणीचे 1261 प्राप्त अहवालापैकी 1222 अहवाल निगेटिव्ह तर 39 अहवाल
पॉझिटिव्ह (124 अहवाल आरटीपीसीआरला पाठवण्यात आले आहेत). खासगी रुग्णालये/लॅब
मध्ये 7222 प्राप्त अहवालापैकी 7088 निगेटिव्ह तर 134 पॉझीटिव्ह असे एकूण 191
अहवाल पॉझीटिव्ह आहेत तर एकूण 4 रूग्णांचा मृत्यू झाला आहे.
जिल्ह्यात आज अखेर एकूण 2 लाख 2 हजार 272
पॉझीटिव्हपैकी 1 लाख 94 हजार 615 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आज अखेर
जिल्ह्यात एकूण 2 हजार पॉझीटिव्ह रुग्ण आहेत.
आज संध्याकाळी 5 वाजेपर्यंत प्राप्त 191
पॉझीटिव्ह अहवालापैकी आजरा-3, भुदरगड-2, चंदगड-0, गडहिंग्लज-1, गगनबावडा-0 हातकणंगले-33, कागल-5, करवीर-21, पन्हाळा-8,
राधानगरी-3, शाहूवाडी-6, शिरोळ-21, नगरपरिषद क्षेत्र-47, कोल्हापूर महापालिका
क्षेत्र-38, इतर जिल्हा व राज्यातील-3 असा समावेश आहे.
आजअखेर तालुका, नपा आणि मनपा क्षेत्रनिहाय
रुग्णांची संख्या पुढीलप्रमाणे - आजरा-5371, भुदरगड- 5089, चंदगड- 3878,
गडहिंग्लज- 7439, गगनबावडा-721, हातकणंगले-22895, कागल-7924, करवीर-31217,
पन्हाळा-10652, राधानगरी-4970, शाहूवाडी-4907, शिरोळ- 13366, नगरपरिषद क्षेत्र-21997,
कोल्हापूर महापालिका 52 हजार 884 असे एकूण 1 लाख 93 हजार 691 आणि इतर जिल्हा व
राज्यातील – 8 हजार 581 असे मिळून एकूण 2 लाख 2 हजार 272 रुग्णांची आजअखेर
जिल्ह्यात संख्या आहे.
जिल्ह्यातील एकूण 2 लाख 2 हजार 272 पॉझीटिव्ह
रूग्णांपैकी 1 लाख 94 हजार 615 रूग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे. तर एकूण 5 हजार 657
जणांचा मृत्यू झाला आहे. आजअखेर उपचारार्थ दाखल झालेल्या जिल्ह्यातील रूग्णांची
संख्या 2 हजार इतकी आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.